ठाणो : काँग्रेसची बांधणी करायची असेल तर ती शिवसेनेसारखी करा असा सल्ला प्रख्यात पत्रकार व राज्य सभेचे माजी खासदार खुशवंत सिंग यांनी राहुल गांधी यांना दिला होता, असा गौप्यस्फोट शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. राज्यात अनेक प्रश्न असतांना नारायण राणो यांच्या किरकोळ गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
गडकरी रंगायतन येथील आयोजित विजय संकल्प शिबिराला मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की, कॉंग्रेस पक्षाची मला नव्याने बांधणी करायची आहे ती कशी करु, त्यासाठी कोणाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवू, असा प्रश्न राहुल गांधी यांनी खुशवंत सिंह यांना केला असता, त्यांनी हा सल्ला राहुल यांना दिला होता.
जे पक्षात येत आहेत, त्यांना पक्षाची कवाडे खुली आहेत, परंतु ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना त्रस दिला त्यांना शिवसेनेत
घेतले जाणार नसल्याचा पुनरुच्चार करीत जे गेले आहेत, त्यांनी त्याच पक्षात किती लढायचे ते लढावे, त्याने आपल्याला काही फरक फडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसमध्ये मोठे पद मिळेल या अपेक्षेने गेलेल्यांची अवस्था हाताच्या कोप:याला गुळ लागल्यासारखी झाली आहे. धड तो चाटताही येत नाही, आणि काढताही येत नाही, असा टोलाही त्यांनी राणो यांचे नाव घेता लगावला. (प्रतिनिधी)