शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी हिवाळी अधिवेशनात विधेयक

By admin | Updated: November 16, 2014 02:10 IST

राज्यात मराठा आणि मुस्लीम आरक्षण लागू करण्यासाठी न्यायालयात टिकेल असे र्सवकष विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात आणण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यात मराठा आणि मुस्लीम आरक्षण लागू करण्यासाठी न्यायालयात टिकेल असे र्सवकष विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात आणण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रलयात  झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.  
मंत्रलयात झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकलेच पाहिजे, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी ताबडतोब सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करण्यासाठी विधिज्ञांची समिती स्थापन  करण्यात येईल. उच्च न्यायालयाने राणो समितीच्या अहवालावर ताशेरे ओढल्यामुळे राणो समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने ही समिती अधिक माहिती गोळा करेल आणि उपाय सुचवेल. आरक्षणाबाबत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. 
या बैठकीस संपूर्ण मंत्रिमंडळासह शिवसेना नेते दिवाकर रावते, काँग्रेसचे नसीम खान, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्यासह महाधिवक्ता दरायस खंबाटा व वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
चर्चा राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीची
राष्ट्रवादीने या शनिवारच्या बैठकीकडे पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावर, केवळ विधिमंडळातील गटनेत्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.  मात्र, खराब हवामानामुळे अजित पवार बैठकीसाठी पोहोचू शकले नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. 
शांतता राखा : मुख्यमंत्र्यांचे आवाहन 
आघाडी शासनाने घेतलेल्या या निर्णयावरील खटल्याचा युक्तिवाद विधानसभा निवडणुकीपूर्वी  18 सप्टेंबरलाच संपला. त्यावरचा निकाल शुक्रवारी 14 तारखेला देण्यात आला. या  आरक्षणासंदर्भात राज्य शासनाची भूमिका सकारात्मक आहे. त्यामुळे निकालाविरुद्ध राज्यात आंदोलने न करता राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.  (प्रतिनिधी)