शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरीला जाऊ नये म्हणून...

By admin | Updated: April 1, 2017 00:12 IST

दुचाकी चोरी होणे, ही वाहनचालकांची सध्या मोठी डोकेदुखी ठरत आहे. याला आळा घालण्यासाठी येथील अविनाश रामदास चौधरी

रामदास डोंबे / खोरदुचाकी चोरी होणे, ही वाहनचालकांची सध्या मोठी डोकेदुखी ठरत आहे. याला आळा घालण्यासाठी येथील अविनाश रामदास चौधरी या विद्यार्थ्याने आधुनिक पद्धतीचे उपकरण बनविले आहे. त्याच्या या प्रयोगाला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला आहे. अविनाश हा कासुर्डी येथील सुहास अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. वाघोली येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनात त्याने दुचाकी चोरीला जाऊ नये, म्हणून हा प्रयोग सादर केला. सध्याच्या परिस्थितीत दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार दुचाकीला जर पासवर्ड पद्धत अवलंबली तर गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण रोखता येईल, असा विचार त्याच्या मनामध्ये आला. त्यानुसार दुचाकीला बॅटरी स्टार्टर ऐवजी पासवर्ड पद्धतीचे उपकरण तयार केले. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने कीपॅडवर चुकीचा पासवर्ड टाकला तर त्या गाडीचे सायरन वाजून संबंधित व्यक्तीला मोबाईलवर मेसेज येतो. आपली गाडी कोणीतरी चोरून नेण्याचा प्रयत्न करीत आहे, असा संदेश येतो आणि दुचाकीस्वार सतर्क होतो. यामध्ये ‘जीएसएम’ नावाचे उपकरण बनविले आहे. जर एखाद्या व्यक्तीस कीपॅडचा पासवर्ड माहिती आहे, अशा वेळेस दुसऱ्याला पासवर्ड माहिती न होण्यासाठी ज्या व्यक्तीची गाडी आहे तो मोबाईलद्वारेही आपली गाडी सुरू करू शकतो. भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एस. एन. पाटील, प्राचार्य डॉ. टी. के. नागराज व डॉ. वाय. एस. अंगाळ यांच्या उपस्थितीत अविनाशला गौरविण्यात आले. दुचाकीतील उपकरण बनविण्यासाठी सुहास अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक के. आर. सकपाळ व आर. जी. दांडगे यांनी मार्गदर्शन केले.राज्यस्तरीय बक्षिसाने गौरवअविनाशला हे उपकरण तयार करण्यासाठी केवळ दोन हजार रुपये इतका खर्च आला आहे. मात्र हेच उपकरण लाखो रुपयांची दुचाकी गाडी चोरीस जाण्यापासून संरक्षण करते. त्याच्या या उपक्रमाची वाघोली अभियांत्रिकी विद्यालयाने दखल घेऊन अविनाश चौधरी यास प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय बक्षीस देऊन गौरविले.