शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीच्या जोरावर ठरल्या बिहारच्या पहिल्या महिला रेल्वेचालक

By admin | Updated: March 8, 2016 00:50 IST

सामान्य जीवन तर सारेच जगतात... मात्र, वेगळे काहीतरी करण्याची... इतरांपेक्षा स्वत:ला असामान्य घडविण्याची, सिद्ध करण्याची तिची जिद्द महत्त्वाची ठरली. सोलापूर रेल्वे विभागातील एकमेव महिला

बारामती : सामान्य जीवन तर सारेच जगतात... मात्र, वेगळे काहीतरी करण्याची... इतरांपेक्षा स्वत:ला असामान्य घडविण्याची, सिद्ध करण्याची तिची जिद्द महत्त्वाची ठरली. सोलापूर रेल्वे विभागातील एकमेव महिला रेल्वेचालक असणारी ३५ वर्षीय अनिता राजीव राज-यादव सर्वसामान्यांच्या कौतुकाचा विषय ठरल्या आहेत. बिहारमधील त्या पहिल्या महिला रेल्वेचालक यापूर्वीच ठरल्या आहेत. अनिता या मूळच्या बिहार राज्यातील राहिवासी आहेत. त्यांचे वडील अभियंता आहेत. वडिलांसह कु टुंबीयांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन’मधील पदविका मिळविली. त्यासाठी त्यांनी झारखंड येथे जाऊन शिक्षण घेतले. लहानपणी टीव्हीवर यशस्वी ‘सेलीब्रिटी’ ना पाहणे त्यांचा छंद होता. याच छंदातून त्यांनी आजची वेगळी वाट निवडली. या वाटेवर त्यांनी ‘बिहारची पहिली महिला रेल्वेचालक’ ही ओळख मिळविली आहे.रेल्वे चालविताना अनेक जण आश्चर्याने कौतुकाने पाहतात. आई, वडील, पती, सासूसह सासरच्या मंडळींना त्यांच्या कामाचा अभिमान आहे. त्यामुळे त्यांचे धाडस दुणावते. कामाचा हुरुप वाढतो, असे अनिता आवर्जून सांगतात. त्यांची सासू बिहारच्या आरोग्य सेवेत आहेत. त्या सुनेच्या कामाविषयी त्यांचे छायाचित्र दाखवून माहिती देतात. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याचे अधिक साहस येते. त्यांचे पतीदेखील ‘बिझनेसमन’ आहेत. त्यांना ६ वर्षांची मुलगी आहे.> एक को देखके दस लडकियाँ आगे बढेगीया क्षेत्रात येण्याबाबत मुली फारशा इच्छुक नाहीत. येथील करिअरविषयी माहिती नसल्याने त्यांच्यामध्ये अनास्था आहे. या पार्श्वभूमीवर अनिता यांनी केलेले आवाहन मुलींना दिशादर्शक ठरावे. ‘इन्सान हिम्मत करे तो कुछ भी हो सकता है. लडकियाँ आगे बढे, और समेटले ये मोका. एक को देखके दस लडकियाँ आगे बढेगी. > ‘मैं अपनी जिद पे आयी हूँ’...बारामतीच्या रेल्वे स्थानकावर त्या मालवाहतूक रेल्वेतून ३६०० टन माल घेऊन आल्या होत्या. या वेळी त्यांच्याशी संवाद साधला. ‘मै अपनी जिद पे आयी हूँ’ असे त्या ‘लोकमत’ शी बोलताना सुरुवातीलाच सांगतात. रेल्वेच्या परीक्षेलादेखील मोजक्याच मुली होत्या. निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी त्यांच्यासमवेत एक-दोन मुलीच होत्या. अवघड असूनही त्यांनी मोठ्या जिद्दीने, परिश्रमाने हे प्रशिक्षण भुसावळ येथे पूर्ण केले. त्यानंतर त्या सोलापूर रेल्वे विभागात दौंड (जि. पुणे) येथे सहायक रेल्वेचालक पदावर रुजू होऊन स्वत:ला सिद्ध केले.बिहारची कर्मभूूमी सोडून नोकरीनिमित्त त्या या ठिकाणी पोहोचल्या आहेत. रेल्वे चालविण्याचे तंत्र त्यांनी जिद्दीने आत्मसात केले. वास्तविक महिला म्हणून त्यांना ‘आॅफिस’काम रेल्वे प्रशासन सहजपणे देऊ शकते. मात्र, त्यांना सहज, सोपे जीवन मान्य नाही. त्यांनी ही ‘ड्युटी’आवर्जून मागवून घेतली आहे. आता ७ वर्षांच्या अनुभवानंतर त्या स्वत: रेल्वेचालक म्हणून काम पाहत आहेत. मालवाहतूक, पॅसेंजर रेल्वे त्या सराईतपणे चालवितात.