शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बिग बी राज्यातील फळबागांचे ब्रँड अँम्बेसेडर

By admin | Updated: June 6, 2014 12:16 IST

राज्य सरकारने फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्याचा विचार सुरु केला आहे. विशेष म्हणजे बिग बींनीही या बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ६ -  राज्याच्या विविध भागांमधील आंबा, चिकू, कांदा, टॉमेटोच्या फळबागांमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार बिग बी अर्थात महानायक अमिताभ बच्चन फेरफटका मारताना आढळल्यास आश्चर्यचकीत होऊ नका. राज्य सरकारने फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्याचा विचार सुरु केला आहे. विशेष म्हणजे बिग बींनीही या बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 
कुछ दिन तो गुजारीये गुजरात मे असे सांगत गुजरात पर्यटन विभागाची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन सर्वांनीच बघितले. याचा फायदा गुजरात सरकारला झाला होता. गुजरात सरकारनंतर आता महाराष्ट्र सरकारनेही अमिताभ बच्चन यांची फळबागांचे ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. 'फळबागांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील फलोत्पादन मंत्र्यांसोबत बैठक झाली. आंबा, चिकू, टॉमेटो यासारख्या फळबागांचे प्रोमोशन करण्यासंदर्भात चर्चा केली'  असे ट्विट केले आहे. फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील अमिताभ बच्चन यांच्याशी चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमिताभ यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती झाल्यास राज्यातील फळबाग लागवड करणा-यांना याचा मोठा फायदा होणार हे मात्र नक्की.