शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाबा-बुवांना राज्यमंत्रिपदे मिळतात हीच मोठी शोकांतिका - सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:52 IST

देशातील एका राज्यात बाबाबुवांना सत्तेत राज्यमंत्रिपद बहाल केली जातात आणि याविरोधात समाजातून साधा आवाजही उठविला जात नाही, हीच या देशाची मोठी शोकांतिका आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.

मुंबई : देशातील एका राज्यात बाबाबुवांना सत्तेत राज्यमंत्रिपद बहाल केली जातात आणि याविरोधात समाजातून साधा आवाजही उठविला जात नाही, हीच या देशाची मोठी शोकांतिका आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा स्वागत व अंमलबजावणी’ ही राज्य परिषद झाली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सामाजिक सुधारणेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याची गरज आहे. अंनिसला त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सर्वार्थाने मदत करेल, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले.शिवसेनेच्या उपनतेत्या आमदार नीलम गोºहे म्हणाल्या की, कायदा राबविताना सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे़आपापल्या विभागातीलप्रत्येक पोलीस स्टेशनवरीलअधिकारी व शिपाई यांच्यापर्यंत आजची ही कायद्याची पुस्तिका पोहोचली पाहिजे़हा कायदा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक वर्षाची प्रचार यात्रा काढणार असल्याचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.ही यात्रा १ मे महाराष्ट्र दिनी मुंबईहून सुरू होऊन सर्व जिल्ह्यातून नागपूर येथे १ मे २०१९ ला संपेल. तीन वर्षांत समाजसुधारणेमधे अग्रणी असलेला महाराष्ट्र जातपंचायतमुक्त करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा यामागचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.परिषेदला फेडरेशन आॅफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे नरेंद्र नायक तसेच पंजाब, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तराखंड येथील प्रतिनिधी उपस्थित होते. जातपंचायतीच्या मनमानीने बाधित व्यक्तींची सुटका करून प्रतिकात्मक रूपात परिषदेचे उद्घाटन झाले. बरखास्त केलेल्या १३ जातपंचायतींच्या प्रतिनिधींचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी कायदाविषयक चित्रमय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.- केवळ कायदा करून आपले उद्दिष्ट साध्य होणार नाही. जोपर्यंत समाजमन हा बदल स्वीकारत नाही तोवर अविरत काम करावे लागेल. समाजबदलासाठी उत्साहाने काम करण्यास तयार असलेला आजचा मेळावा बघून आज मला निवांत झोप लागेल, अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भावना मांडली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे