शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील बडा नेता अडचणीत; रमेश गोवेकर हत्येचा नव्याने तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 06:04 IST

सभापतींचे निर्देश : चौकशीचा मागे लागणार ससेमिरा

मुंबई : तेरा वर्षांपूर्वी मालवणमधून बेपत्ता झालेले शिवसैनिक रमेश गोवेकर यांचे काय झाले, याचा कोणताच खुलासा झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचीपुन्हा चौकशी करा, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरूवारी सरकारला दिले. या प्रकरणाची फाईल उघडण्याचा आग्रह लावून धरत निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेने कोकणातील एका बड्या प्रतिस्पर्धी नेत्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे.

रमेश गोवेकर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. मात्र या तपासातून काही उलघडा झाला नाही. परिणामी सीबीआयने तपास थांबवला होता. गहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी सीबीआयचा अहवाल सभागहाच्या पटलावर ठेवला. यावर, शिवसेना गटनेते अनिल परब यांनीआक्षेप घेतला. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. मात्र, सदनात वारंवार तीच माहिती दिली जात आहे. याप्रकरणाचे कुठलेही धागेदोरे अद्याप हाती लागलेले नाहीत. याप्रकरणात एक मृतदेह हाती लागला होता. तो कुणाचा होता याचाही खुलासा झालेला नाही, असे सांगत या केसची फाईल पुन्हा उघडण्याची मागणी परब यांनी केली. यावर, सीबीआयच्या तपासाची माहिती सरकारने पटलावर ठेवली आहे. तरीही सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन गृहविभागाचे अतिरीक्त मुख्य सचिवांमार्फत ही केस उघडता येईल का, याचा विचार करू उत्तर गृहराज्यमंत्री केसरकर यांनी दिले.चौकशीची फाईल पुन्हा उघडणारगोवेकर प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यासाठी गृहविभागाच्या अतिरीक्त मुख्य सचिवांमार्फत तातडीची बैठक घ्यावी. या बैठकीला सर्व आमदारांना बोलवावे. या बैठकीत ठोस निर्णय घ्यावा, असे निर्देश सभापतींनी स्वत:च्या अधिकाराखाली आदेश दिले.

टॅग्स :MurderखूनNarayan Raneनारायण राणे