शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

बुलडाण्यातील एक मोठे, चार मध्यम व २४ लघु प्रकल्प ओव्हरफ्लो

By admin | Updated: October 4, 2016 18:39 IST

मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पासह नदी, नाले, बंधा-यात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. सततधार पावसामुळे काही

- हर्षनंदन वाघ/ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 04 - मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पासह नदी, नाले, बंधा-यात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. सततधार पावसामुळे काही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून त्यात जिल्ह्यातील मोठे १, मध्यम ४ व लघु २४ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्प परिसरातील उन्हाळ्यातील पाणीटंचाईची चिंता मिटली आहे.
 सिंचनाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात, परिसरातील गावाची पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी जिल्ह्यात मोठे ३, मध्यम ७ व  ८१ लघु प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पातील संकलीत साठा ५३५.५० दलघमी असून आतापर्यंत ३५६.५० दलघमी साठा आला आहे. त्याची टक्केवारी ६६.५५ आहे. दरवर्षी आतापर्यंत पावसाच्या लहरीपणामुळे काही प्रकल्पात पाणीसाठा निर्माण झाला होता. तर अनेक प्रकल्प ठोरडे पडले होते. मात्र यावर्षी सुरवातीला चांगला पाऊस झाला, तसेच परतीच्या पावसाने मागिल आठवड्यात ३० सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दमदार हजेरी लावल्याने व नियमित सततधार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प
ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यात मोठ्या नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या ३ प्रकल्पापैकी खडकपूर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे. मध्यम पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या ७ प्रकल्पापैकी पलढग, मस, कोराडी व उतावळी हे ४ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तर ८१ लघु प्रकल्पापैकी २४ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्प परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे.
 
ओव्हरफ्लो झालेले २४ लघु प्रकल्प
 जिल्ह्यातील २४ लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यात चिखली, झरी बु.,मासरूळ,  कंडारी, पिंप्री गवळी, रायपूर, मिसाळवाडी,  गारडगाव, केशवशिवणी, अंचरवाडी-१, अंचरवाडी-२, पिंपळगाव चिलम,  टाकळी, हिवरखेड-१, गणेशपूर,
हिवरखेड-३ पिंपळगाव नाथ, पिंपळनेर,पळशी,  धनवटपूर, कळमेश्वर, कंडारी, ढोरपगाव, विद्रुपा यांचा समावेश आहे.
 
सोयाबीन, कापूस पिकाला फटका
जिल्ह्यात मागिल दोन आठवड्यापासून दमदार पाऊस होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका सोयाबीन, कापूस पिकाला होणार आहे. सोयाबीन सोंगणीला आली असून काही शेतात सोयाबीनचा शेंगा  जमिनीवर पडत आहेत. मात्र पावसामुळे त्या काढता
येत नाही. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर मोताळा तालुक्यासह कपाशी पेरा असलेल्या भागात कपाशीच्या कैºया किड पडून सडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात घटन येण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर पिकांना त्याचा कमी-जास्त प्रमाणात फटका बसणार असल्याचा अंदाज शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.