शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वह्या, पुस्तके, रजिस्टरला मोठी मागणी

By admin | Updated: June 6, 2017 02:45 IST

शाळेच्या सुटया आता संपत आल्या असून यंदा पावसाने मध्येच जोर दाखवून कधी थंड केलेले तर कधी उन्हाचे चटके असे विषम वातावरण सध्या जव्हारमध्ये बघावयास मिळत आहे.

हुसेन मेमन। लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार: शाळेच्या सुटया आता संपत आल्या असून यंदा पावसाने मध्येच जोर दाखवून कधी थंड केलेले तर कधी उन्हाचे चटके असे विषम वातावरण सध्या जव्हारमध्ये बघावयास मिळत आहे. पावसाने अद्याप सुरवात केलेली नसल्यामुळे कडक उन्हातही खेडोपाड्यातील व शहरातील बांधव खरेदीच्या लगबगीत दिसत आहेत. विद्यार्थी आणि पालक या सर्वांना शाळेचे वेध लागले आहे. सध्या विद्यार्थी जगतात दप्तरे, वह्या, रजिस्टर, नवीन शाळेचे गणवेश, शालेय साहित्य, बूट, रेनकोट, छत्र्या या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झालेली आहे. जव्हार तालुक्यात एकूण १ लाख ६० हजारच्या आसपास लोकसंख्या आहे, आणि खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना व शहरी विद्यार्थ्यांना यासर्व शालेयपयोगी वस्तू खरेदीसाठी जव्हार येथील बाजारपेठेत यावे लागत, त्यामुळे मोठ्या संख्येने बाजरपेठ भरगङ्ख असल्याचे दृष्य सर्वत्र दिसत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी वर्ग उत्साहात आपल्याला लागणारे साहित्य खरेदी करण्याकरीता वह्या, रजिस्टर, पेन, पेन्सील, दप्तर, छत्री आदिंची लिस्ट तयार करून दुकानादाराकडे देऊन साहित्य घेत आहेत. गतवषार्पेक्षा यंदा हे साहित्य १५ ते २० टक्क्यांनी वाढल्यामुळे खिशाला मात्र कैची लागल्याने पालकवर्गात थोड्या प्रमाणात नाराजी दिसत आहे.दप्तर, कंपास, छत्री, रेनकोट, या वस्तूंमध्ये शेकडो प्रकार उपलब्ध असतात, त्यामुळे विद्यार्थी कुठल्या प्रकारची निवड करेल, याचा थांगपत्ता दुकानदाराला नसतो, आणि आपल्याकडे आलेला ग्राहक परत जाऊ नये म्हणून दुकानदार मोठ्या प्रमाणात नाना प्रकारच्या शालेय वस्तू उपलब्ध करून ठेवतो, त्यामुळे व्यापारी वर्गाचीही मोठ्या प्रमाणात रक्कम अडकलेली असते, सिझन सुरू झाला की, व्यापाऱ्यांना जेवणाचीही फुरसत नसते, असे जव्हारचे व्यापारी इम्तियाज बल्लू यांनी बोलतांना सांगितले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खरेदीदारांत थोडीफार वाढ झालेली आहे, असेही इतर व्यापऱ्यांचे म्हणणे आहे. शालेय उपयोगी वस्तू विविध प्रकारांत बाजारपेठेत दाखल झाले असून पाऊस सुरू न झाल्याने सध्यातरी बालगोपाळांची झुंबड बाजारात दिसत आहे.यंदा बाजारपेठेत चांगली गर्दी दिसत आहे, रजिस्टर, पेन, कंपास, दप्तर, छत्री, रेनकोट खरेदी करीता ग्राहक येत आहेत.-इम्तियाज बल्लू, क्लासीक जनरल व्यापारी, जव्हार