शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चा तयारीलाही मोठी गर्दी

By admin | Updated: September 22, 2016 02:11 IST

मराठा समाजाच्या वतीने निघणाऱ्या मराठा क्रांती मोचार्साठी हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, लोणी काळभोर या ठिकाणी नियोजनासंदर्भात बैठका झाल्या

उरुळी कांचन : पुणे येथील २५ सप्टेंबरला मराठा समाजाच्या वतीने निघणाऱ्या मराठा क्रांती मोचार्साठी हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, लोणी काळभोर या ठिकाणी नियोजनासंदर्भात बैठका झाल्या. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे युवकांनी मोठ्या प्रमाणात या बैठकांना हजेरी लावली होती. तसेच सर्वपक्षीय आजी-माजी पदाधिकारी आणि महिलांचीही विशेष उपस्थिती होती.कोपर्डी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, मराठा आरक्षण त्वरित मिळावे यासह अ‍ॅट्रॉसिटी कायदा दुरुस्त करावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती मिळावी आणि शेतीमाल उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने हमी बाजारभाव मिळालाच पाहिजे. या मोर्चात अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड, उपाध्यक्ष राकेश काळभोर, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख गोरख कामठे, तालुकाध्यक्ष विजय गोते, कार्याध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, उपाध्यक्ष शैलेश चौधरी, निखिल गोते, नंदनी मुरकुटे आदी पदाधिकारी प्रयत्न करताना दिसत आहे. गटतट विसरून राजकीय जोडे बाजूला ठेवून युवकाचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रसंगी महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती योगिनी कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष देविदास कांचन, माजी उपसरपंच भाऊसाहेब तुपे, मनसे शहर अध्यक्ष विजय मुरकुटे, ग्रामपंचायत सदस्य सुनील कांचन, सागर पोपट कांचन, तंटामुक्तीचे अध्यक्ष अमित कांचन, निखिल खेडेकर, हवेली राष्ट्रवादी उपाध्यक्ष सागर कांचन, शहराध्यक्ष सुभाष बगाडे, माजी सदस्य मारुती कांचन, नितीन कांचन शांताराम चौधरी,निखिल कांचन, शुभभ काळे, दत्तात्रय कोल्हे, गणपत गायकवाड आदी उपस्थित होते.>सोशल मीडियाचा जोरमराठा समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ईबीसी सवलत उत्पन्नमयार्दा ६ लाख करा, यासाठी पुणे येथे २५ सप्टेंबरला मराठा समाजाच्या वतीने निघणाऱ्या मराठा क्रांती मोचार्साठी पूर्व हवेलीत गावोगावी नियोजनाच्या बैठकांनी मोठ्या प्रमाणात वेग घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. युवकांनी जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यासही सुरुवात केली आहे.