शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बिअरशॉपीचे नियम धाब्यावर

By admin | Updated: May 30, 2016 02:13 IST

शहरातील अनेक बिअरशॉपीबाहेर उघड्यावर मद्यपान होत असल्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- शहरातील अनेक बिअरशॉपीबाहेर उघड्यावर मद्यपान होत असल्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र उत्पादन शुल्क विभागाकडून त्यांच्यावर कारवाई न करता ‘अर्थ’पूर्ण चुप्पी साधली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. परिणामी पादचारी नागरिक व रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.शहरातील बिअरशॉपी चालकांकडून नियम धाब्यावर बसवत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे प्रकार सुरू आहेत. मात्र उघडपणे चालणाऱ्या या प्रकाराकडे उत्पादन शुल्क विभागाकडून होणारे दुर्लक्ष म्हणजे ‘अर्थ’पूर्ण चुप्पी असल्याचा संशय सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. तर पोलिसांनी काही ठिकाणी कारवाई केल्यानंतरही काही दिवसात पुन्हा बिअरशॉपीबाहेरचे गैरप्रकार सुरु होत आहेत. त्यामुळे तक्रार करायची तर कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.सीबीडी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर उघड्यावरचे ठिकाण तळीरामांचा शहरातला मोठा अड्डा झाला आहे. अग्निशमन दलाच्या भिंतीला लागूनच श्याम वाईन्सच्या बाहेरच दिवस-रात्र हा प्रकार सुरु असतो. मात्र त्याठिकाणी उघड्यावर मद्यपान केले जात असतानाही उत्पादन शुल्क विभागाचे व पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. बिअरशॉपीचे परवाने देताना उत्पादन शुल्क विभागाकडून त्यांना काही अटी व नियम घातले जातात. यामध्ये बिअरशॉपीबाहेर मद्यपान होवू नये या अटीचाही समावेश आहे. परंतु सर्व अटी व नियम धाब्यावर बसवत शहरातील अनेक बिअरशॉपीबाहेर मद्यपानाला अनुमती दिली जात असल्याचे दिसत आहे. काही बिअरशॉपी चालकांनी लगतचेच गाळे भाड्याने घेवून त्याठिकाणी ग्राहकांच्या बैठकीची सोय करुन दिलेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गाळ्यांमध्ये अथवा उघड्यावर बेकायदा बार तयार झाले आहेत. बारऐवजी बिअरशॉपीबाहेरच उघड्यावर मद्यपान केल्यास ग्राहकाची पैशाची बचत होवू शकते. शिवाय घरी नेवून एका बाटलीवर भागवणारे देखील शॉपीबाहेर किमान दोन बाटल्या रिचवतात. यामुळे धंद्याला तेजी मिळत असल्यामुळे सर्रास बिअरशॉपीबाहेर उघड्यावर मद्यपानाला बेकायदा परवानगी दिली जात आहे. यात तळीरामांचाही फायदा असल्यामुळे उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्राहकांसाठी चकण्याची सोय म्हणून बिअरशॉपीबाहेरची सार्वजनिक मोकळी जागा फेरीवाल्यांना भाड्याने देण्याचे प्रकार होत आहेत. परंतु पदपथ व्यापले गेल्यामुळे पादचारी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असाच प्रकार घणसोली रेल्वेस्थानकासमोर मीना वाईनशॉपच्या बाहेर पहायला मिळत आहे. उघड्यावर मद्यपान केले जात असल्यामुळे पोलिसांनी सदर बिअरशॉपीवर यापूर्वी कारवाई देखील केलेली आहे. परंतु कारवाईनंतरही काही दिवसातच पुन्हा त्याठिकाणी उघड्यावर मद्यपानाला सुरवात झालेली आहे. यामुळे अशा शॉपीचालकांच्या पाठीशी छुपी ताकद असल्याचे स्पष्ट होत आहे.