शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
2
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
3
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
4
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
5
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
6
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
7
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
8
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
9
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
10
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
11
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
12
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
13
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
14
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
15
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
16
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
17
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
18
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
19
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
20
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख

हेल्मेट न घातल्यामुळे पुण्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू

By admin | Updated: February 7, 2016 13:57 IST

पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध होत असताना पुण्याच्या विश्रामवाडी परिसरात एका दुचाकीस्वाराचा हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. ७ - पुण्यात सर्वपक्षीय राजकीय नेते हेल्मेटसक्तीला विरोध करत असताना पुण्याच्या विश्रामवाडी परिसरात एका दुचाकीस्वाराचा हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पुण्याच्या विश्रामवाडीमध्ये शनिवारी रात्री एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेले नसल्यामुळे डोक्याला मार लागून मृत्यू झाला. 
या दुचाकीस्वाराचे नाव समजू शकलेले नाही. हा दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला तेव्हा त्याच्या शरीरावर डोक्याचा भाग वगळता अन्यत्र कुठेही इजा झालेली नव्हती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मागच्यावर्षी पुण्यात दुचाकीच्या अपघातात १०० पेक्षा जास्त मृत्यू झाल्याचे एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने सांगितले. 
पुण्यात सध्या दुचाकीस्वाराला करण्यात आलेल्या हेल्मेट सक्तीवरुन राजकारण सुरु आहे. सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन या हेल्मेट सक्तीला विरोध करत आहेत. यासाठी पुण्यात आंदोलने सुरु आहेत. 
दुचाकी चालवणारा चालक आणि मागे बसणारा दोघांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती शनिवारपासून राज्यभरात लागू करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्याच्या परिवहन आयुक्तांनी सांगितले.