शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष संपल्यानंतर मिळाल्या सायकली

By admin | Updated: April 30, 2016 00:41 IST

पुणे जिल्हा परिषदेने विविध विभागांमार्फत गेल्या वर्षी जिल्हा परिषद शाळांतील सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

पुणे : पुणे जिल्हा परिषदेने विविध विभागांमार्फत गेल्या वर्षी जिल्हा परिषद शाळांतील सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, त्याचे वाटप करण्यास शैक्षणिक वर्षाची अखेर उजाडली. शुक्रवारी प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते या २३ हजार ११६ सायकलींचे वाटप करण्यात आले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकली देण्यात आल्या आहेत. २0१४-१५ या वर्षी पाचवीच्या काही मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी प्रशासनाने पाचवी ते सातवीच्या सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना मात्र १ किलोमीटर अंतराची अट टाकून सायकली देण्याचा निर्णय घेतला. यात महिला बालकल्याण विभागातर्फे पाचवी ते सातवीतील मुलींना १0 हजार ५५५, शिक्षण विभागातर्फे सर्वसाधारण गटातील मुलांना ५ हजार ७१४ व समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय मुलांना ६ हजार ८४७ सायकली देण्यात आल्या.यासाठी तिन्ही विभागांची मिळून एकत्र निविदा काढण्यात आली. यापूर्वी ही प्रकिया आरसीवर होत होती. मात्र, शासनाने ई-निविदा बंधनकारक केल्याने नोव्हेंबर महिन्यात निविदा काढण्यात आली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आलेल्या निविदा तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरल्या. त्यानंतर जानेवारीत निविदा काढण्यात आली. तिला १५ फेबु्रवारीच्या सभेत मंजुरी मिळून मुलांच्या सायकलींचा ठेका कोहिनूर सायकल प्रा. लि. लुधियाना यांना, तर मुलांच्या सायकलींचा ठेका रवी इंडस्ट्रीज यांना मिळाला. ठेका मिळाल्यानंतर २५ मार्चदरम्यान या सायकलींचे पार्ट आले. ते जोडून देण्यात १ महिना गेला. त्यात सायकली कोणत्या विभागाने वाटपाची जबाबदारी घ्यायची याच्यात वाद झाला. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सुरुवातीला ही जबाबदारी घेण्यास असमर्थता दर्शवली. (प्रतिनिधी)