शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांच्या एमईटीवर ‘भूखंडकृपा’

By admin | Updated: April 15, 2016 02:42 IST

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या एमईटी संस्थेला ५० हजार चौरस मीटर इतकी जमीन केवळ ९ लाख ३८ हजार रुपयांत देण्यात आली. वित्त विभागाच्या सचिवांनी आक्षेप नोंदविलेला

- यदु जोशी,  मुंबईमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या एमईटी संस्थेला ५० हजार चौरस मीटर इतकी जमीन केवळ ९ लाख ३८ हजार रुपयांत देण्यात आली. वित्त विभागाच्या सचिवांनी आक्षेप नोंदविलेला असतानाही तत्कालिन वित्तमंत्र्यांनी रेडीरेकनरनुसार ९ कोटी ३९ लाख रुपये किंमत असलेली ही जागा केवळ ९ लाख ८ हजार रुपयांत एमईटीला दिली, असा ठपका लोकलेखा समितीने ठेवला आहे. ४ डिसेंबर २००८ रोजी हा निर्णय झाला तेव्हा जयंत पाटील हे वित्त मंत्री होते. मुळात किरकोळ खनिजांच्या उत्खननासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकरता नाशिकजवळची (मौजे गोवर्धन) ९१ हजार ३०० चौरस मीटर जमीन राखून ठेवण्यात आली होती. त्या जमिनीची मे २००० मध्ये एमईटीचे एक विश्वस्त समीर भुजबळ यांनी अभियांत्रिकी व तंत्र महाविद्यालय सुरू करण्यासाठी मागणी केली. नोव्हेंबर २००३ मध्ये प्रारंभी यापैकी ४१३०० चौरस मीटर जमीन खाणकामाऐवजी शिक्षणासाठी १.५५ लाख भोगवटा किंमतीवर एमईटीला देण्यात आली. त्यानंतर या महाविद्यालयाच्या विस्तारासाठी समीर भुजबळ यांनी उरलेल्या ५० हजार चौरस मीटर जागेची मागणी केली. एमईटीला नाशिक जिल्ह्यात १.५३ लाख चौरस मीटर जमीन आधीच दिलेली असतानाही सवलतीच्या दराने पुन्हा जमीन देण्याची गरज नाही, असे सांगत वित्त विभागाने २१ नोव्हेंबर २००८ रोजी आक्षेप घेतला. तसेच, जमीन द्यायचीच होती तर २००८ मध्ये बाजारभावाने द्यायला हवी होती, असाही स्पष्ट अभिप्राय दिला. त्याचवेळी महसूल विभागाने वित्त विभागाला कळविले होते की, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या धोरणानुसार विनाअनुदानित सोसायटीला सवलतीच्या दरात जमीन देणे म्हणजे सोसायटीला एकप्रकारे अनुदान देण्यासारखेच आहे; जे योग्य नाही. वित्त सचिवांनी आक्षेप घेऊन देखील वित्तमंत्र्यांनी ४ डिसेंबर २००८ रोजी महसूल विभागाने पूर्वी केल्याप्रमाणे त्याच पद्धतीत सवलतीच्या दराने जमीन देण्याबाबतच्या शिफारशी मान्य केल्या. रेडिरेकनरनुसार ९.३९ कोटी रुपये जमिनीची किंमत असताना एमईटीला ५० हजार चौरस मीटर जागा ही केवळ ९ लाख ८ हजार रुपयांत देण्यातआली.ही जमीन एमईटीला दिल्यानंतर विशिष्ट कालावधीत त्या जमिनीवर बांधकाम करणे आवश्यक होते. मात्र, या अटीचाही एमईटीने भंग केला, असा ठपकादेखील समितीने ठेवला आहे. शैक्षणिक संस्थांना सवलतीच्या दरात जमीन देण्याचे शासनाचे आधीपासूनचेच धोरण आहे. त्या धोरणानुसारच एमईटीला जमीन देण्याचा निर्णय झाला होता. माझ्याकडून गेलेल्या प्रस्तावाला महसूल विभाग आणि मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी मिळाली असेल. धोरणाची चौकट मोडली गेली नाही.- जयंत पाटील, तत्कालीन वित्तमंत्री