शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

भुजबळांची तुरुंगातील रात्र गेली शांततेत

By admin | Updated: March 19, 2016 02:26 IST

आर्थर रोडमध्ये गुरुवारी रवानगी झालेल्या छगन भुजबळांची तुरुंगातील गुरुवारची रात्र शांतपणे गेली. त्यांना रात्री फारशी झोप मात्र लागली नाही. त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि तुरुंगातील

- डिप्पी वांकाणी,  मुंबईआर्थर रोडमध्ये गुरुवारी रवानगी झालेल्या छगन भुजबळांची तुरुंगातील गुरुवारची रात्र शांतपणे गेली. त्यांना रात्री फारशी झोप मात्र लागली नाही. त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि तुरुंगातील कैद्यांना जे काही दिले जाणारे जेवणच ते जेवले, आम्ही त्यांना समीर भुजबळपासून दूर असलेल्या जागी ठेवले आहे, असे वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.त्यांच्या निकटवर्तीयांनी ‘लोकमत’ला सांगितले की सध्या तरी आम्ही भुजबळांना घरचे जेवण आणि किंवा औषधे देण्यासाठी अर्ज करणार नाही. मात्र भुजबळांना जामीन मिळण्यासाठी कधी अर्ज करायचा यावर वकिलांची चर्चा सुरू आहे. हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) प्रकरणामध्ये जामिनासाठी अर्ज करताना आरोपी कसा दोषी नाही याचे पुरावे द्यावे लागतात. त्यामुळे एकदा चौकशी यंत्रणेकडून आरोपपत्र दाखल झाले की जामिनासाठी अर्ज करणे शहाणपणाचे ठरेल. परंतु ताबडतोब अर्ज करावा का यावर आम्ही विचार करीत आहोत.मात्र, भुजबळ यांना मिळालेली न्यायालयीन कोठडी ही चौकशीला वरदानच ठरली आहे, असे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यांचा पुतण्या समीर याला आणल्यावर सगळा दोष तो स्वत:वर घेईल, अशी आम्हाला भीती होती त्यामुळे या दोघांना एकमेकांसमोर आणण्यात आले नाही. ईडीच्या खूप महत्त्वाच्या साक्षीदारांनी जे पुरावे या प्रकरणात दिले आहेत त्यामुळे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ असे दोघेही त्यात दोषी ठरू शकतील, असे हा अधिकारी म्हणाला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या माहितीनुसार सध्या वकिलांच्या तुकडीसोबत बैठका सुरू आहेत. या प्रकरणात छगन भुजबळांच्या जामिनासाठी नेमका कधी अर्ज करावा यावर मोठी चर्चा सुरू आहे. भुजबळांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे आम्हाला एक पाऊल मागे यावे लागले असे आम्ही समजत नाही. समीर व भुजबळ समोरासमोर आल्यावर आणखी काही पुरावे समोर येऊ शकतील. साक्षीदारांच्या निवेदनामुळे आमची बाजू बळकट झाली आहे. पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अंतर्गत दिले गेलेले निवेदन हे ग्राह्य धरले जाते आणि त्याचे मोल हे दिवाणी न्यायालयात केलेल्या निवेदनाएवढे असते, ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले. - समीर व भुजबळ समोरासमोर आल्यावर आणखी काही पुरावे समोर येऊ शकतील. साक्षीदारांच्या निवेदनामुळे आमची बाजू बळकट झाली आहे. पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अंतर्गत दिले गेलेले निवेदन हे ग्राह्य धरले जाते आणि त्याचे मोल हे दिवाणी न्यायालयात केलेल्या निवेदनाएवढे असते, ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले.