शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांची होळी कारागृहातच

By admin | Updated: March 24, 2016 01:56 IST

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांची होळी साजरी करण्यासाठी जामिनावर तात्पुरती सुटका करण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांची होळी साजरी करण्यासाठी जामिनावर तात्पुरती सुटका करण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे भुजबळ यांना होळी कारागृहातच साजरी करावी लागणार आहे.छगन भुजबळ यांनी धुलिवंदन साजरा करण्यासाठी जामिनावर तात्पुरती सुटका करण्यात यावी, असा अर्ज विशेष प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रीग अ‍ॅक्ट (पीएमएलए) दिला होता.‘मी ज्येष्ठ व चांगला नागरिक आहे. मी खरा भारतीय असून, आतापर्यंत मी गरीब लोकांना मदत केली आहे. त्यात शेतकरी व अपंग व्यक्तींचा समावेश आहे. या कामांमुळे मला समाजात आदर मिळाला आहे. मी उत्तम प्रशासक आणि एक चांगला नेता आहे. मला राजकारणाचा बळी करण्यात आले आहे,’ असे भुजबळ यांच्या जामीन अर्जात म्हटले होते. त्यांच्या जामीन अर्जावर तपास यंत्रणेने आक्षेप घेतला. पीएमएलएमध्ये अशा प्रकारच्या तात्पुरत्या जामिनाची तरतूद नाही. त्यामुळे अर्जात नमूद करण्यात आलेल्या मुद्यांमध्ये अर्थ नाही, असा युक्तिवाद सक्तवसुली संचालनालयाचे अ‍ॅड. हितेन वेणेगावकर यांनी केला.महाराष्ट्र सदनाचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराकडून लाच स्वीकारल्याचा आणि त्यांच्यामुळे सरकारच्या तिजोरीला ८८७ कोटी रुपयांचा फटका बसल्याचा भुजबळ यांच्यावर आरोप आहे. मंत्री असताना भुजबळ यांनी सरकारी कामांचे कंत्राट देताना कंत्राटदारांकडून लाच स्वीकारून आपले नातेवाईक संचालक असलेल्या कंपन्यांमध्ये ते गुंतवले आणि हवाला व्यवहाराद्वारे ते परदेशी पाठवले असाही आरोप भुजबळ यांच्यावर आहे. भुजबळ यांना १४ मार्च रोजी ईडीने ताब्यात घेतले. विशेष न्यायालयाने त्यांना ३१ मार्च रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)