शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांच्या ‘क्लीन चिट’वर बांधकाम मंत्र्यांची स्वाक्षरी !

By admin | Updated: January 12, 2016 02:40 IST

महाराष्ट्र सदनप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या ‘क्लीन चिट’ अहवालावर राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत

मुंबई : महाराष्ट्र सदनप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या ‘क्लीन चिट’ अहवालावर राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचीही स्वाक्षरी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांप्रमाणेच राज्य सरकार आता पाटील यांचीही चौकशी करणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करण्याचा तत्कालीन मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेला निर्णय व त्यानंतर फायलींचा सुरू झालेल्या प्रवासाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लिखित स्वरूपात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना बांधकाम खात्याने नोव्हेंबर महिन्यातच एसीबीला आपला अहवाल पाठविला; परंतु त्याची चर्चा मात्र गेल्या महिन्यात करण्यात आली. भुजबळ यांना महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात ‘क्लीन चिट’ देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या अहवालावर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सचिव आनंद कुलकर्णी व अन्य अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र ही बाब उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने लाचलुचपत विभागाला ‘क्लीन चिट’ अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालातही बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दोषमुक्त केल्याचे मानले जात असून, ज्याप्रमाणे अधिकाऱ्यांची चौकशी केली, त्याचप्रमाणे या अहवालावर स्वाक्षरी करणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही चौकशी करणार काय, असा सवाल केला जात आहे. भाजपाचे मंत्री खोटे बोलतातनाशिक येथे पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी भाजपाचे मंत्री खोटे बोलतात, असा आरोप केला. महाराष्ट्र सदन व कलिना मध्यवर्ती ग्रंथालय या दोन्ही प्रकरणात आपला काहीही संबंध नाही हे वारंवार आपण सांगितले, तरीही खोटे-नाटे आरोप करून यात गुंतविण्याचा प्रयत्न झाला. अखेर सत्य बाहेर आले. यात सार्वजनिक बांधकाम खात्याचा व मंत्री म्हणून माझा काहीही संबंध नसल्याचा अहवाल विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनीच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला सादर केला आहे. त्यामुळे सरकार उघडे पडले, असेही भुजबळ म्हणाले.