शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

भुजबळांचा जामिनासाठी कोर्टात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 04:53 IST

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जामिनासाठी विशेष ‘पीएलएमए’ (प्रीव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयात अर्ज केला आहे.

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जामिनासाठी विशेष ‘पीएलएमए’ (प्रीव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने या जामीन अर्जावर सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.छगन भुजबळ १७ मार्च २०१६ पासून न्यायालयीन कोठडीत आहेत. तेव्हापासून त्यांना अधिक चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले नाही. याचाच अर्थ त्यांच्या ताब्याची आवश्यकता नाही. तसेच भुजबळ यांच्यावर २७ एप्रिल २०१६ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गेले एक वर्ष भुजबळ कारागृहातच खितपत पडून आहेत. त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करण्यात यावी, असे भुजबळ यांच्या वकिलांनी जामीन अर्जात म्हटले आहे.भुजबळ यांचे वकील शलभ सक्सेना यांनी न्यायालयाला सांगितले. के. एस. चमणकर किंवा अन्य आरोपींनी भुजबळ यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कंत्राटाच्या मोबदल्यात पैसे दिल्याचे पुरावे नाहीत, असेही अर्जात म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने ईडीला उत्तर देण्याचे निर्देश दिले.