शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांना लवकरच मिळणार डिस्चार्ज

By admin | Updated: April 24, 2016 03:05 IST

माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्यामुळे लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. भुजबळ यांच्या प्रकृतीच्या तपासणी अहवाल पाहता, त्यांना रुग्णालयात

मुंबई : माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्यामुळे लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. भुजबळ यांच्या प्रकृतीच्या तपासणी अहवाल पाहता, त्यांना रुग्णालयात दाखल करून घेणे योग्यच असल्याचा अहवाल जे. जे. रुग्णालयातील ४ डॉक्टरांच्या समितीने सादर केला आहे. भुजबळ यांच्या हृदयाच्या ठोक्यांचे (हॉल्टर मॉनिटरिंग) निरीक्षण करण्यासही परवानगी दिली आहे. १८ एप्रिल रोजी छगन भुजबळ यांना दातदुखी आणि छातीत दुखत असल्यामुळे सेंट जॉर्ज रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. त्या वेळी त्यांचा रक्तदाब वाढला असल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती का? याची चौकशी जे. जे. रुग्णालयातील ४ डॉक्टरांच्या स्थानिक चौकशी समितीने केली होती. या समितीला डॉ. रोहन सिक्वेरा यांनी सर्व माहिती दिली होती. तीन दिवसांनी आलेल्या समितीच्या अहवालात छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. शनिवार, २३ एप्रिलला भुजबळ यांना सीटीस्कॅन आणि सोनोग्राफीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. भुजबळ यांचा रक्तदाब नियंत्रणात आला आहे. त्याचबरोबर मधुमेहही नियंत्रणात आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या हृदयाचे ठोके नियंत्रणात आले की नाहीत, हे तपासण्यासाठी ‘हॉल्टर मॉनिटरिंग’ करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)राहुल घुले यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्रमुंबई : आर्थररोड कारागृहातून छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी डॉ. राजन घुले यांनी मदत केल्याच्या आरोपाला नाकारत घुले यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी आणखी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. एक जबाबदार वैद्यकीय अधिकारी म्हणून मी त्यांना या सर्व बांबींची वैद्यकीय तपासणी सेंट जॉर्ज रुग्णालयात करुन घेण्याबाबत सल्ला दिला. याची माहिती कारागृह अधिक्षक भारत भोसले यांनी लेखी स्वरुपात रजिस्टर क्रमांक ३२ मध्ये दिली. मुख्य वैद्यकीय अधिकारी त्यावेळी कारागृहात कर्तव्यावर हजर नव्हते. मात्र या प्रकरणाची कारागृह अधीक्षक भोसले यांना कल्पना होती.भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय भोसले व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोड यांचा होता. मी कागदोपत्री कोणतीही खाडाखोड केलेली नसल्याचे डॉ. घुले यांचे म्हणणे आहेआपल्यावरील आरोप खोटे असून याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी त्यांनी आणखीन एक पत्र मुंख्यमंत्र्यांना लिहिले आहे. त्यात त्यांनी वरील बाबींचा नमूद केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास आपण आझाद मैदान येथे उपोषणाला बसण्याचा इशाराही डॉ.घुले यांनी दिला आहे.