शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांवर महिन्याभरात आणखी एक आरोपपत्र

By admin | Updated: February 26, 2016 02:10 IST

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुुटुंबीयांविरोधात कलिना सेंट्रल लायब्ररीप्रकरणी एका महिन्यातच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व त्यांच्या कुुटुंबीयांविरोधात कलिना सेंट्रल लायब्ररीप्रकरणी एका महिन्यातच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली.महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी बुधवारी छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले, तर गुुरुवारी नवी मुंबईच्या ‘हेक्स वर्ल्ड’ घोटाळाप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. आता कलिना विद्यापीठातील राज्य सरकारच्या सेंट्रल लायब्ररीप्रकरणी एका महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती, गुरुवारी एसीबीने न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाला दिली.कलिना विद्यापीठाचा भूखंड हडप केल्याची केस गंभीर असून, याचा संपूर्ण तपास करण्यासाठी व भुजबळ आणि कुुटुंबीयांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल, अशी माहिती एसीबीच्या वकिलांनी खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने एसीबीला एक महिन्याची मुदतवाढ दिली.एसीबीच्या म्हणण्यानुसार, संबंधित भूखंड मुंबई विद्यापीठाचा होता. मात्र, या भूखंडावर लायब्ररी बांधण्याचे कंत्राट खासगी विकासकाला देण्यात आले. यासाठी भुजबळ यांना मोठ्या रकमेची लाच देण्यात आली. भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेची आणि भूखंड हडप केल्याची चौकशी करून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया आणि प्रीती मेनन यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)