शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांना तुरुंगात मिळते चिकन आणि दारू - अंजली दमानिया

By admin | Updated: May 16, 2017 21:39 IST

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांची आॅर्थर रोड तुरुंगात शाही बडदास्त ठेवली जात

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांची आॅर्थर रोड तुरुंगात शाही बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तसे पत्रच त्यांनी तुरुंग विभागाचे महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांना पाठविले आहे. छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ सध्या आॅर्थर रोड तुरुंगात असून, त्यांची तिथे विशेष बडदास्त ठेवली जात आहे. कारागृहातच पाच फुटी टीव्ही बसविण्यात आला असून, त्यावर भुजबळ हिंदी सिनेमे पाहतात. शिवाय, त्यांना जेवणासाठी चिकन मसाला, दर दोन तासांनी फळे पुरविली जात असल्याचा आरोप दमानिया यांनी भूषणकुमार उपाध्याय यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. शिवाय, समीर भुजबळांसाठी तुरुंगातच दारू पोहोचविण्यात येत आहे. नारळपाण्याच्या नावाखाली तुरुंगात व्होडका पोहोचत असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. भुजबळांना देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीबाबत तुरुंगात काम करणाऱ्या लोकांनी माहिती दिल्याचा दावा दमानिया यांनी केला. जानेवारी महिन्यापासून हा सारा प्रकार सुरू आहे. समीर भुजबळ रोज सकाळी तीन तास मोबाइलवर बोलत असतात. त्यासाठी मोबाइल जॅमरमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावा दमानिया यांनी उपाध्याय यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. भुजबळांना न्यायालयात हजर करताना नियम धाब्यावर बसवून अनेक लोक त्यांना भेटले. यात मोठ्या प्रमाणावर राजकीय मंडळी होती. याबाबत माध्यमांमध्ये बातम्या येऊनही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप दमानिया यांनी केला.  - अंजली दमानिया यांची तक्रार मिळाली असून, पुढील कार्यवाहीसाठी तुरुंग विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. दमानिया यांनी यापूर्वी जे आरोप केले होते त्याबाबत याआधीच त्यांना वस्तुस्थिती सांगण्यात आली होती, असेही उपाध्याय यांनी स्पष्ट केले.