शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या होर्डिंगवरून भुजबळ झाले गायब

By admin | Updated: January 5, 2017 03:58 IST

बसवंत येथे गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याच्या होर्डिंगवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे छायाचित्र वगळण्यात आल्या

नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपळगाव बसवंत येथे गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याच्या होर्डिंगवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे छायाचित्र वगळण्यात आल्याने पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली असून, पक्षातील ओबीसी कार्यकर्त्यांकडून सोशल माध्यमावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. सदरचा प्रकार मुद्दाम करण्यात आला की होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून भुजबळ यांना दूर ठेवण्याचा पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला, याचा उलगडा होऊ शकला नाही. जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नावाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात व विशेष करून पिंपळगाव, निफाड तालुक्यात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याच्या फलकावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व संपर्क नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह आयोजक म्हणून ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक अध्यक्ष सचिन पिंगळे व आयोजक माजी आमदार दिलीप बनकर यांचे छायाचित्र आहे. या फलकावर भुजबळ यांचे छायाचित्र नसल्याची बाब लक्षात येताच, त्यातून वेगवेगळे अर्थ काढून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा तीव्र पाऊस पडला. भुजबळ यांना पक्षाने डावलल्याची भावना व्यक्त करतानाच, राष्ट्रवादीचा खरा चेहरा उघडकीस आला अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.पक्षाचे नेते शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच या प्रकारामुळे पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. पक्षातील ओबीसी नेत्यांची या संदर्भात गुप्त बैठक होऊन पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहावे की नाही यावर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता.