शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भुशी धरण ओव्हर फ्लो, पर्यटकांना पाय-यांवर जाण्यास मज्जाव

By admin | Updated: July 15, 2017 12:34 IST

पर्यटक पंढरी अशी ओळख असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पायऱ्यांवर वेगाने पाणी वाहू लागले आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना पाय-यांवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 15 - लोणावळा परिसरात झालेल्या दमदार पावसाने पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले लोणावळ्यातील भुशी धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे.  पर्यटक पंढरी अशी ओळख असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पायऱ्यांवर वेगाने पाणी वाहू लागले आहे.  यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना पाय-यांवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. लोणावळी परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.   
 
दोन दिवसांत लोणावळ्यात 312 मिमी पाऊस झाला असल्याने ओव्हर फ्लो झालेल्या भुशी धरणाच्या पायर्‍य‍ांवरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. पाण्याला वेगदेखील जास्त असल्याने पायर्‍य‍ांवर उभे राहणे धोकादायक असल्याने पोलीस प्रशासनाने धरणाच्या पायर्‍यांवर पर्यटकांना जाण्यास मज्जाव केले आहे.
 
(शनिवार-रविवार दुपारी तीननंतर भुशी धरणाकडे वाहनांना प्रवेश बंदी)
दरम्यान, भुशी धरण, लायन्स पॉईंट, सहारा पूल धबधबा परिसरात होणारी वाहतुक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दर शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी दुपारी तीन नंतर भुशी धरणाकडे जाणार्‍या वाहनांना प्रवेश बंदी केली आहे.  तसेच  वलवण व खंडाळा येथील एन्ट्री पॉईंटपासून अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 12 वाजण्याच्यादरम्यान लोणावळा शहरात प्रवेश बंदी करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी  दिली.  
 
(मुंबईकरांसाठी खूशखबर ! मोडक सागर धरण ओव्हरफ्लो)
शिवथरे म्हणाले शनिवार व रविवार तसेच इतर सुट्टयांच्या काळात होणारी वाहतूक कोंडी व पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी काही पर्यायी मार्ग, वाहनतळे तयार करण्यात आली आहे. वलवण ते खंडाळा व कुमार चौक ते भुशी धरणापर्यतचा मार्ग सीसीटीव्हीच्या कक्षेत आणला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकरता बंदोबस्ताकरिता 47 पोलीस अधिकारी, 231 पोलीस कर्मचारी, 63 महिला पोलीस, एक स्ट्रायकिंग फोर्सची मागणी करण्यात आली आहे. 
 
 
(दरड कोसळण्याच्या भीतीमुळे माळशेज घाट 2 दिवस बंद)
 
तर दुसरीकडे, माळशेज घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी पर्यटकांना माळशेज घाटात न जाण्याचं आवाहन केले आहे. यामुळे पर्यटकांसाठी माळशेज घाट दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे. शनिवारी व रविवारी घाटात सहलीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली आहे. 
 
सध्या परिसरात दरडींचा अंदाज घेणे सुरू आहे. दरम्यान वाहतुकीवर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून माळशेज घाटात सतत दरडी कोसळण्याचा धोका जाणवत असल्यानं पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येते