शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून बेकायदा भूमिपूजन

By admin | Updated: September 18, 2016 04:15 IST

ठाकुर्ली-माणकोली येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन होण्याअगोदर शनिवारीच डोंबिवलीत शिवसेनेने भूमिपूजन केले

डोंबिवली : मोठागाव ठाकुर्ली-माणकोली येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन होण्याअगोदर शनिवारीच डोंबिवलीत शिवसेनेने भूमिपूजन केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यावरून हे घडल्याची चर्चा असली तरी त्यांनी या कार्यक्रमापासून चार हात दूर राहण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासकीय समारंभात या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम भिवंडीजवळ ठेवल्याने कल्याण-डोंबिवलीमधील शिवसैनिक नाराज झाले होते. त्यानंतर, डोंबिवली शहर शाखेने भूमिपूजनाचा घाट घातला. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्याला दांडी मारली. डोंबिवली व कल्याणच्या शहरप्रमुखांच्या हस्ते या वेळी भूमिपूजन करण्यात आले.डोंबिवली शहरप्र्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शुक्रवारी मध्यवर्ती शाखेत बैठक घेऊन हा घाट घातला. त्यासाठी कल्याण व उल्हासनगरातून शिवसैनिक आले होते. तेथे त्यांनी ‘हमसे जो टकरायेगा...’ अशा घोषणा देत भूमिपूजन केले. (प्रतिनिधी)>एकनाथ शिंदे गैरहजररविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजर राहणे क्रमप्राप्त असल्यानेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या अनधिकृत भूमिपूजन सोहळ्यास हजर राहिले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे भूमिपूजन समारंभावरून शिवसैनिकांमध्ये असलेली खदखद व्यक्त करतात की गप्प बसतात याबाबत शिवसैनिकांमध्ये उत्सुकता आहे. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबतही भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.>शिवसेनेच्या हातावर भाजपाची तुरी मुंबई : महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेना व भाजपामध्ये श्रेयाचे राजकरण पेटले आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने भाजपा नेते पालिकेच्या प्रकल्पांचे परस्पर उद्घाटन करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. दहिसर येथील उद्यान, जलतरण तलाव व व्यायामशाळेचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.मात्र पालिकेचा निधी या प्रकल्पांसाठी खर्च झाला असताना मित्रपक्ष शिवसेनेला डावलून स्थानिक भाजपा नगरसेवक यांनी परस्पर हा कार्यक्रम आयोजित केला. याची खबर उशिरा लागलेल्या शिवसेनेला केवळ हात चोळत बसावे लागले.नगरसेवकांनी पालिकेच्या प्रकल्पांचे परस्पर उद्घाटन करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी काँग्रेसच्या नगरसेविका नयना सेठ यांनी माटुंगा येतील प्रकल्पाचे असे उद्घाटन केले होते. मात्र या वेळेस मित्रपक्षांमध्येच श्रेयासाठी रस्सीखेच सुरू आहे.