शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भीष्मराज बाम यांचे निधन

By admin | Updated: May 13, 2017 02:46 IST

माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक व ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम (७९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शुक्रवारी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक व ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम (७९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शुक्रवारी सायंकाळी येथे निधन झाले. मानसोपचारातील भीष्म असणाऱ्या बाम यांनी भारतातील क्रीडापटूंना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याचे शिवधनुष्य उचलले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, दोन बहिणी असा परिवार आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल. बाम हे योग विद्येसंदर्भात महात्मा सभागृहात व्याख्यान देत असतानाच कोसळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. विश्वविक्रमवीर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आदी क्रिकेटपटूंसह आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांची कामगिरी उंचावण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरूर, गगन नारंग तसेच विश्वविक्रमवीर बिलियर्डसपटू गीत सेठी, धावपटू कविता राऊत यांच्यासह शेकडो खेळाडूंना मानसिक एकाग्रता आणि अन्य प्रकारचे मार्गदर्शन भीष्मराज बाम यांनी केले. राज्य शासनाने त्यांना २०११-१२ वर्षासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले होते. बाम यांनी सेवानिवृत्तीनंतर भारतीय योगशास्त्राचा अभ्यास केला आणि त्यातून क्रीडा मानसोपचार विषयावर प्रभुत्व मिळविले. राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या नेमबाजी संघासह मुंबई रणजी संघाचे मानसोपचार सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले होते. विजयाचे मानसशास्त्र, मार्ग यशाचा, संधीचे सोने करण्याची इच्छाशक्ती, मना सज्जना आणि विनिंग हॅबीटस् ही त्यांची पुस्तके गाजली. विनिंग हॅबीटस् या पुस्तकाचा १२ भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे.