शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भीमा-पाटसचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: January 21, 2017 01:20 IST

वीजबिल थकल्यामुळे विद्युत महावितरण कंपनीने कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला असल्याने कारखान्यासह कामगारांची वसाहत अंधारात आली आहे.

पाटस : पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे सव्वा कोटीच्या जवळपास वीजबिल थकल्यामुळे विद्युत महावितरण कंपनीने कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला असल्याने कारखान्यासह कामगारांची वसाहत अंधारात आली आहे. दरम्यान, भीमा-पाटस कारखान्याने ३२५ कामगारांना तात्पुरते कमी केल्याने (कामगारांना ले आॅफ दिल्याने) कामगार संतप्त झाले असून, कारखान्याच्या प्रशासनाने एकांगी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कामगार औद्योगिक न्यायालयात धाव घेणार असल्याचे भीमा-पाटस साखर कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी हनुमंत वाबळे यांनी स्पष्ट केले.चालू हंगामात भीमा-पाटस कारखाना सुरू झालेला नाही. परिणामी गेल्या वर्र्षापासून कामगारांना पगारदेखील नाही. एकंदरीतच कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता कामगारांच्या १४ महिन्यांच्या पगाराबरोबरीने विद्युतबिलदेखील थकलेले आहे. त्यामुळे गुरुवार (दि.१९) सायंकाळपासून कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला असून, याला विद्युत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनीदेखील दुजोरा दिला आहे.एकंदरीतच कारखान्याच्या विद्युतपुरवठ्यावर कामगारांच्या वसाहतीतील वीजपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे कामगारांची वसाहतदेखील अंधारात आहे. परिणामी या भागातील वाढत्या डासांचा प्रादुर्भाव लक्षात घेता कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विजेअभावी कामगारांना पाण्याचीदेखील टंचाई भासू लागली आहे. या प्रकारामुळे कामगारांच्या कुटुंबात संतापाची लाट उसळली आहे. संघटनेला विश्वासात घेतले नाही : हनुमंत वाबळेभीमा-पाटस कारखान्याच्या प्रभारी कार्यकारी संचालक यांनी २२५ कायम आणि १00 हंगामी कामगारांना तात्पुरते कमी केल्याची नोटीस टाइम आॅफिसला लावल्याने कामगारांत संताप निर्माण झाला. कारखाना व्यवस्थापनाच्या निषेधार्थ कामगारांनी कारखान्याच्या स्थळी निषेध सभा घेतली. या वेळी भीमा-पाटस कारखान्याचे जनरल सेक्रेटरी हनुमंत वाबळे यांनी जाहीर भाषणात कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. दरम्यान, कामगारांच्या विरोधात घेतलेला हा एकांगी निर्णय आहे. तेव्हा आता कामगार गप्प बसणार नाहीत. या विरोधात कामगार न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कामगार संघाचे पदाधिकारी केशव दिवेकर म्हणाले की, व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे कामगार आणि ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.