शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीतील भावली धरण फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 15:57 IST

संपूर्ण इगतपुरी तालुक्याची पिण्याच्या पाण्याची भिस्त असलेले भावली धरण पूर्ण भरल्याने आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले

ऑनलाइन लोकमत
घोटी (नाशिक), दि. 22 -  संपूर्ण इगतपुरी तालुक्याची पिण्याच्या पाण्याची भिस्त असलेले भावली धरण पूर्ण भरल्याने आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. भावली धरण पाच दिवसांपूर्वी पूर्णपणे भरल्याने आज या धरणाची विधिवत शासकीय जलपूजन करण्यात आले. 
 
यावेळी या धरणाच्या पाणीसाठ्याबाबत आढावा घेवून या धरणाच्या संपूर्ण पाण्याचे पूर्ण तालुक्याला लाभ होईल, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या आहेत.  हे धरण पर्यटनासाठी अव्वल असल्याने धरण परिसर सुशोभित करुन जनतेसाठी चांगल्या दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित होण्यासाठी आपण प्राधान्य देऊ, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
 
भावली धरणाच्या जलपूजनावेळी आमदार निर्मला गावीत, कार्यकारी अभियंता आर एस शिंदे, रमेश गावित, तहसीलदार अनिल पुरे, कार्यकारी शाखा अभियंता सुहास पाटील,  पांडुरंग शिंदे, भास्कर गुंजाळ, पंकज माळी, गुलाब वाजे, साहेबराव धोंगडे, कैलास घारे, जगन शेलार, विजय कडू, सौ मंजुळा  भले, त्र्यंबक गुंजाळ, सोमनाथ जोशी, सामाजिक कार्यकर्त्या आशा शिंदे,  किरण फलटणकर,  साहेबराव धोंगडे, यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले.  
 
उत्तर महाराष्ट्रात त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सर्वप्रथम इगतपुरी तालुक्यातील भावली धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले, निसर्गाची कृपा व वरदहस्त या इगतपुरी मतदार संघावर कायम असो. त्याचबरोबर मतदारसंघातील उर्वरित अन्य धरणेही लवकरात लवकर भरो, जलसंपदा हीच खरी राष्ट्रीय संपत्ती आहे. संपूर्ण जनतेला या पाण्याचा लाभ होवो. तालुक्यातील व मतदारसंघातील जनता सुखी समाधानी व संपन्न होवो, अशी प्रार्थना यावेळी आमदार निर्मला गावित यांनी केली. अर्ध्या महाराष्ट्राला पिण्याचे व सिंचनाचे पाणी पुरवणाऱ्या दारणा, मुकणे, कडवा, वाकी व वैतरणा धरणही लवकर भरो, अशीही प्रार्थना यांनी यावेळी केली.