शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी काठावर अवतरली पंढरी

By admin | Updated: June 28, 2016 01:40 IST

संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांचा पालखीसोहळा आषाढी वारीसाठी पंढरीकडे मार्गस्थ झाला.

देहूगाव : संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांचा पालखीसोहळा आषाढी वारीसाठी पंढरीकडे मार्गस्थ झाला. देहूकरांनी वैष्णवांची मनोभावे सेवा केली. अन्नदान केले. सोहळ्यास अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त होता. पालखी सोहळ्याने देहूतील वातावरण भक्तिमय झाले आहे.‘‘पुण्य उभे राहो आता, संताचे या कारण, पंढरीच्या लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल...’ याप्रमाणे समाजातील सर्वधर्मसमभावाची व त्यागाचे प्रतीक असलेली भगवी पताका हवेत उंचावत पालखी सोहळ्यातून एकात्मतेचे दर्शन घडले. मुख्य मंदिर, वैकुंठगमन मंदिर परिसरातील इंद्रायणी काठ सकाळपासूनच फुलून गेलेला होता. इंद्रायणी नदीच्या काठावर व मुक्कामाच्या ठिकाणी दिंड्यांमध्ये पताकांसह वारकऱ्यांचे खेळ रमले होते. मंदिराच्या आवारात पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडल्यानंतर फुगडी, टाळाच्या तालावर पावले टाकली जात होती, तर काही भाविक उंचच उंच उडी घेत ‘विठ्ठल विठ्ठल’ असा मंत्र जपत आपला थकवा घालवत होते. मानकरी, सेवेकरीचोपदार नामदेव गिराम (देशमुख), श्री. खैरे यांच्यासह सेवेकरी, मानकरी यांचा संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. परंपरेनुसार ताशा वाजविण्याचा मान रफिक मुलानी, चौघड्याचा माऊली पांडे, पिराजी पांडे, मंगेश पांडे, उमाजी पांडे यांना, तर पालखी उचलण्याचा मान कळमकर, प्रकाश टिळेकर, नामदेव भिंगारदिवे, आबू पवार यांना होता. संबळ व चौघड्याच्या तालावर चांदीची अब्दागिरी रघुनाथ अडागळे यांनी, तर माणिक अवघडे जरीपटका घेतला. पोपट तांबे यांनी तुतारी, तर बलभीम भांडे यांनी संबळ वाजविला. मुक्कामासाठी इनामदार वाड्याकडे रवाना झाली. येथे प्रथेप्रमाणे रात्री म्हतारबुवा खानापूरकर यांचे कीर्तन व जागर झाला. दुसऱ्या दिवशी भागवतबुवा बोळेगावकर यांचे इनामदारवाड्यातून आकुर्डीकडे पालखी प्रस्थान होण्यापूर्वी कीर्तन झाले. येथून पालखी उद्या सकाळी साडेदहाला आकुर्डीकडे मार्गस्थ होईल, असे पालखीप्रमुख सुनील दामोदर मोरे यांनी सांगितले. विश्वशांती केंद्राचे डॉ. विश्वनाथ कराड, दिगंबर भेगडे, किरण काकडे, संदीप कोहिनकर, अजय भोसले, सचिन टिळक उपस्थित होते. (वार्ताहर)>पादुकांची सेवादेहूतील सुनील घोडेकर (सराफ) यांनी चकाकी दिल्यानंतर घोडेकर कुटुंबीयांनी इनामदार वाड्यात आणल्या. तेथे पूजा करण्यात आली. गंगा म्हसलेकर कुटुंबीयांनी पादुकांना मुख्य मंदिरात नेले. ग्रामोपाध्याय सुभाष टंकसाळे व गिरीधर खुंटे यांनी मंत्रोच्चार केला. रंगल्या फुगड्याज्ञानोबा तुकोबांच्या जयघोष, टाळ मृदंग गजराने देहूगाव नागरी भक्तीमय झाली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री गिरीश बापट आणि पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांनी फुगड्यांचा आनंद लुटला. पावसाची हजेरीसकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारपर्यंत काहीसा उकाडा जाणवत होता. दुपारी दीडच्या सुमारास सुमारे वीस मिनिटे वरुण राजानेही हजेरी लावली. ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. या आल्हाददायक वातावरणात हरीगजर सुरू होता.