शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
3
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
4
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
5
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
6
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
7
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
8
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
9
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
10
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
11
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
12
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
13
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
14
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
15
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
16
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
17
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
18
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
19
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला

भाऊसाहेब फुंडकरांची मंत्रिपदी वर्णी!

By admin | Updated: July 8, 2016 00:43 IST

बुलडाणा जिल्ह्याला आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्या रूपाने मंत्रिपदाचा लाल दिवा मिळणार.

खामगाव: बुलडाणा जिल्ह्याला आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्या रूपाने मंत्रिपदाचा लाल दिवा मिळणार आहे. शुक्रवारी होणार्‍या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आ. भाऊसाहेब फुंडकरांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणे जवळ-जवळ निश्‍चित झाले असून, या निर्णयामुळे खामगावसह पश्‍चिम वर्‍हाडातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला असून ८ जुलै रोजी विस्तार होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ आ. भाऊसाहेब फुंडकर यांचे स्थान निश्‍चित झाले असून त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. दरम्यान, पक्षातील ज्येष्ठ स्थान आणि त्यांच्या पाठीशी असणारा प्रदीर्घ अनुभव यामुळे त्यांना मंत्रिपद मिळावे, अशी तमाम नागरिकांची आकांक्षा होती. अखेर ती आकांक्षा पूर्ण होताना दिसत असून तीन वेळा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार, अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार, दहा वर्षे विरोधी पक्षनेतेपदाचा प्रवास आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी केला आहे. राज्यातील बहुजन चेहरा म्हणून त्यांची ओळख असून शेतकरी आणि कष्टकर्‍यांचे नेते म्हणूनही त्यांची संपूर्ण राज्यभर ख्याती आहे.

जनसंघ ते भाजपा भाऊसाहेबांचा अखंड प्रवास!

            भाऊसाहेब फुंडकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची पाळेमुळे बळकट केली आहे. जनसंघ ते भाजपा असा त्यांचा प्रवास असून, आणीबाणीनंतर खर्‍या अर्थाने भाऊसाहेबांनी आपल्या तळागाळातील सहकार्‍यांच्या साथीने पक्ष बळकट केला. १९७१ च्या दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. १९७२ ला नागपूर विद्यापीठात खामगावातून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भाऊसाहेबांची सर्वप्रथम निवड झाली . ही त्यांची पहिली निवडणूक होती. आणीबाणीत कारावास भोगल्यानंतर खामगाव विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले. तत्कालीन संघटन मंत्री वसंतराव भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस प्रश्नावर 'खामगाव ते आमगाव' अशी पदयात्रा काढली. त्यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात होता. खुद्द इंदिरा गांधींचा पराभव होऊनसुद्धा अकोल्यातून वसंतराव साठे काँग्रेसवर विजयी झाले होते. असा हा काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळविण्याचे श्रेय भाऊसाहेब फुंडकरांनाच जाते. सलग तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघ त्यांनी भाजपच्या ताब्यात ठेवला. त्यानंतर सातत्याने विधान परिषदेत पक्षाचा व शेतकरी, शेतमजुरांचा आवाज बुलंद केला. पक्षानेही भाऊसाहेबांवर वेळोवेळी मोठी जबाबदारी टाकली. त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदही यशस्वीपणे सांभाळले. तसेच पणन महासंघाचे अध्यक्षपद भूषविले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनदेखील भाऊसाहेबांनी सभागृहात आपला ठसा उमटविला. असा दीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या भाऊसाहेबांना अखेर मंत्रिपद मिळाले.