शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब चव्हाणच्या चौथ्या लॉकरमध्ये 65 लाखांचं घबाड

By admin | Updated: May 11, 2016 18:43 IST

भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण याच्या बँकेतील चौथा लॉकर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी आज तपासणीदरम्यान उघडलं

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 11- केबीसी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण याच्या बँकेतील चौथा लॉकर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी आज तपासणीदरम्यान उघडलं आहे. त्याच्या लॉकरमध्ये 65 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने सापडले आहेत. याआधीही भाऊसाहेब चव्हाणचे तीन लॉकर उघडण्यात आले होते. त्यामध्येही कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने सापडले होते.  पोलीस आता भाऊसाहेब चव्हाणची कसून चौकशी करत आहेत. भाऊसाहेब चव्हाणकडून आणखी काही लपवलेले सोन्याचे दागिने अथवा रक्कम मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 
 
काय आहे केबीसी प्रकरण ?
 
लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा 'केबीसी’चा संचालक भाऊसाहेब चव्हाणला अखेर अटक करण्यात यश आलं. भाऊसाहेब चव्हाणला मुंबई विमानतळावरून अटकही करण्यात आली. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता, भाऊसाहेब चव्हाणच्या बँक लॉकरमधून 2 कोटी किंमत असलेलं 2 किलो 600 ग्रॅम सोन्याची नाणी आढळली. ‘केबीसी’ कंपनीच्या माध्यमातून, गुंतवणूकदारांना अल्पावधीत दामदुप्पट आणि अधिक व्याजदराचं आमिष दाखवून अनेकांना ठकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.. गुंतवणूकदारांना तब्बल 220 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी तो मुख्य आरोपी आहे. गुंतवणुकीपोटी दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून भाऊसाहेब चव्हाणच्या ‘केबीसी’ कंपनीने राज्यभरात लाखो गुंतवणूकदारांना ठकवलं आहे. बरेच जण ‘केबीसी’च्या आमिषाला बळी पडले आणि आयुष्यभराची रक्कम ‘केबीसी’मध्ये गुंतवली. मात्र, यातील बहुतेकांना या पैशावर पाणी सोडावे लागले. त्यांना परतावा तर सोडाच परंतु मूळ रक्कमही मिळाली नाही. या प्रकरणात गुंतवणूकदारांच्या असंख्य तक्रारी फेब्रुवारी 2014ला राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या. त्यानंतर केबीसीचा संचालक भाऊसाहेब चव्हाणसह पत्नी आणि मेहुण्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक केली. 
 
‘केबीसी’च्या माध्यमातून दाखवलेली आमिषं
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 7 सदस्य केल्यास महाराष्ट्रात मोफत टूर
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 36 सदस्य केल्यास गोव्यात एक मोफत टूर
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 81 सदस्य केल्यास दर महिन्याला पाच हजारांचा धनादेश
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 252 सदस्य केल्यास एक लाखाचा एक चेक किंवा दरमहा दहा हजार रुपयांचा चेक
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 756 सदस्य केल्यास एजंटला दर महिन्याला 51 हजार रुपये
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 2268 सदस्य केल्यास एजंटला प्रतिमहिना एक लाख किंवा सात लाखाचे दागिने
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 6804 सदस्य केल्यास एक स्कोडा गाडी मोफत
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 12600 सदस्य केल्यास 51 लाखांचा बंगला मोफत
17 हजार 500 गुंतवणूक करणारे 25556 सदस्य केल्यास एक कोटी रोख रक्कम मिळणार