राहुरी (जि. अहमदनगर) : उसाला, दुधाला भाव नाही, कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे़ त्यामुळे शासनाला जाब विचारण्यासाठी येत्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान भव्य मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी दिला़राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेच्या सभागृहात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिषद झाली़ त्या वेळी ते बोलत होते. शासन भांडवलदारधार्जिणे असून, जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे पाटील यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
शेतीमालाच्या भावासाठी विधान भवनावर मोर्चा
By admin | Updated: July 11, 2015 01:41 IST