शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

धर्माबाद शहरात भोंदूबाबास अटक

By admin | Updated: June 24, 2016 22:53 IST

अज्ञान व अंधश्रद्धेचा फायदा घेत अनेकांना गंडविणाऱ्या भोंदूबाबावर गुन्हा दाखल करुन धर्माबाद पोलिसांनी त्यास अटक केली. विशेष म्हणजे, हा भोंदूबाबा केंद्र शासनाचा कर्मचारी

ऑनलाइन लोकमत

धर्माबाद (जि. नांदेड), दि, २४ - अज्ञान व अंधश्रद्धेचा फायदा घेत अनेकांना गंडविणाऱ्या भोंदूबाबावर गुन्हा दाखल करुन धर्माबाद पोलिसांनी त्यास अटक केली. विशेष म्हणजे, हा भोंदूबाबा केंद्र शासनाचा कर्मचारी असूनही भोळ्याभाबड्या नागरिकांंची फसवणूक करीत होता. येथील गांधीनगरातील रहिवासी व टपाल कार्यालयातील पोस्ट मास्टर डॉ. तौफीकखान पठाण हे जादूटोणा, मंत्र, औषधाने अनेक रोग बरे करतो असे म्हणून अनेक वर्षांपासून अज्ञानी व अंधश्रद्धाळू नागरिकांना फसवित असे. भविष्य, हस्तरेषा बघून पुढे काय होणार सांगतो असे म्हणून अनेक राजकीय लोकांचे नावही घेतो. येथील एका व्यक्तीस मनोरुग्ण असल्याचे त्यावर उपचार करुन बरा करतो म्हणून फसविल्याची तक्रार त्याच्या बहिणीने केली आहे.आसीफ (वय ४०) यास सात वर्षांपासून मनोरुग्ण असल्याचे सांगून साते ते आठ लाख रुपयास गंडविल्याची तक्रार आसीमची बहीण नौसीन ऊर्फ आतिमा बेगम सिकंदर हिने धर्माबाद ठाण्यात दिली. दिलेल्या तक्रारीवरून धर्माबाद पोलिसांनी महाराष्ट्र अनिष्ट रुढी, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रति अधिनियम २०१३, कलम २ (५) (८) या कायद्याप्रमाणे तौफीकखान पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी दिली.