शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

‘भारतमाता की जय’वरून नव्या राजकीय वादाला तोंड

By admin | Updated: March 17, 2016 04:58 IST

‘भारतमाता की जय’वरून देशात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले असताना आज विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले. ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार देणारे एमआयएमचे मुंबईतील

विधानसभेत रणकंदन : एमआयएमचे आमदार निलंबितमुंबई : ‘भारतमाता की जय’वरून देशात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले असताना आज विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले. ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार देणारे एमआयएमचे मुंबईतील आमदार वारिस पठाण यांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. राज्यपालांच्या अभिभाषणावर इम्तियाज जलील बोलत असताना त्यांनी स्मारकांच्या उभारणीला विरोध दर्शविला. स्मारकांची गरज काय? हा लोकांच्या घामाचा तसेच कररूपाने मिळणारा पैसा आहे. राज्यात भीषण दुष्काळ असताना स्मारकांवर खर्च कशाला, असा सवाल जलील यांनी केला. जलील यांच्या वक्तव्याने सत्तारूढ बाकावर अस्वस्थता पसरली. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोध कशासाठी, असा सवाल करीत गदारोळाला सुरुवात झाली. त्यातच भाजपाचे राम कदम यांनी ‘भारतमाता की जय बोलो’ असे आवाहन जलील यांना केले. ‘भारतमाता की जय’ म्हणणार का, अशी विचारणा सत्तापक्षाकडून होत असताना वारिस पठाण बसल्या जागी म्हणाले की, भारतमाता की जय म्हटलेच पाहिजे, असे काही घटनेत लिहिलेले नाही. विजय मल्ल्याने देश सोडून पळून जाताना केलेल्या टिष्ट्वटमध्ये भारतमाता की जय म्हटले होते. तसे म्हणणे तुम्हाला अभिप्रेत आहे का? देशावर आमचेही प्रेम आहे. आम्ही जयहिंद म्हणू!पठाण यांच्या या उत्तराने सभागृहात एकच रणकंदन माजले. भारतमाता की जय म्हणण्यास नकार देणे हा देशाचा आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांचा घोर अपमान असून हा देशद्रोह असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जलील व पठाण यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी केली. सर्व सदस्य वेलमध्ये उतरले. कामकाज तब्बल पाच वेळा तहकूब करण्यात आले. या गदारोळातच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही निलंबनाचा आग्रह धरला. शिवसेनेचे गुलाबराव पाटील, भाजपाचे आशिष शेलार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी भारतमाता की जय न म्हणणाऱ्यांना या सभागृहात बसण्याचा कोणताही अधिकार नाही, असे ठणकावून सांगितले. सभागृहाचे कामकाज तिसऱ्यांदा तहकूब झाले तेव्हा देशप्रेमाच्या प्रचंड घोषणांचा जोर अधिकच वाढला. एमआयएम आमदारांना भाजपा-शिवसेनेच्या किमान ५० आमदारांनी घेरून त्वेषाने, ‘इस देश मे रहना होगा, भारतमाता की जय कहना होगा, इस देश मे रहना होगा, वंदे मातरम कहना होगा, ओवेसी हाय हाय’ अशा घोषणांचा धोशा लावला. सभागृहात अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले. जलील आणि पठाण जागीच शांतपणे बसून होते. काहीही होऊ शकेल, अशी तणावाची स्थिती होती पण दोन्ही बाजूंच्या ज्येष्ठ सदस्यांनी सगळ्यांना समजावले. शेवटी संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी वारिस पठाण यांच्या निलंबनाचा ठराव मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)वारिस पठाण यांना संरक्षणएमआयएमचे आमदार वारिस पठाण यांच्या मुंबईतील घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून त्यांनाही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. पठाण यांनी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजते.‘कुणी माझ्या मानेवर सुरी ठेवली तरी मी भारतमाता की जय म्हणणार नाही’, असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी लातूर जिल्ह्यात उदगिर येथे झालेल्या सभेत म्हटले होते.एमआयएमआमदारांची भूमिका चूकएमआयएमच्या आमदारांची भूमिका चुकीचीच आहे. भारतमातेचा अपमान कोणीही करता कामा नये, पण या दोघांच्या चुकीच्या भूमिकेमुळे अल्पसंख्याक समुदायाला कोणी लक्ष्य करता कामा नये. - अब्दुल सत्तार, काँग्रेसतसे म्हणणे हा माझा अधिकारते म्हणतात की, मी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही, कारण राज्यघटनेचे तसे बंधन नाही. शेरवानी आणि टोपी घाल, असेही राज्यघटनेने सांगितलेले नाही. (तरीही ते घालतात). ‘भारतमाता की जय’ म्हणणे हे माझे कर्तव्य आहे की नाही, याच्याशी माझा संबंध नाही. तसे म्हणण्याचा मला हक्क आहे, म्हणून मी ‘भारतमाता की जय’ म्हणणार.- जावेद अख्तर, ज्येष्ठ गीतकार राष्ट्रवादाची हीच एकमेव व्याख्या हवी भारतवासीयांसाठी ‘भारतमाता की जय’ हीच राष्ट्रवादाची एकमेव व्याख्या असायला हवी. इतर सर्व गोष्टी पळवाटा आहेत.- अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेते (टिष्ट्वटरवर)पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुका पाहूनच भाजपा आणि एमआयएमने एकत्र येऊन ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. - अभिषेक मनू सिंघवी, काँग्रेसचे प्रवक्ते