शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

भातरोपांना जीवदान

By admin | Updated: June 27, 2016 01:36 IST

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वरुणराजाची कृपा होऊन पावसाला सुरुवात झाल्याने भातरोपांना जीवदान मिळाले आहे.

पवनानगर : पावसाला शनिवारी रात्री सुरुवात झाली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वरुणराजाची कृपा होऊन पावसाला सुरुवात झाल्याने भातरोपांना जीवदान मिळाले आहे. पावसाला जोर नसला, तरी शेतकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केले. पवना धरण परिसरात २० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. आजअखेर ६९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणात १२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस सुरू झाल्याने भातरोपाला जीवदान मिळाले असून, नाचणी पिकाच्या रोपाची डोंगरमाथ्यावरील पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.पावसामुळे काल्यार्त पर्यटकांची हजेरीकार्ला : परिसरात शुक्रवारपासून पावसाला सुरुवात झाल्याने पुणे, मुंबईतील पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे या परिसरात वेगवेगळे व्यवसाय करणारे व्यावसायिक समाधानी दिसत आहेत. कार्ला, भाजे परिसरात दर वर्षी पाऊस सुरू झाल्यास पुणे-मुंबईतील पर्यटकांसह संपूर्ण राज्य-परराज्यांतूनही पर्यटक भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. या वर्षी पाऊस १५ दिवस उशिराने आला. त्यामुळे पावसाबरोबर पर्यटकांनी पाठ फिरविली होती. परंतु तुरळक का होईना कार्ला, भाजे परिसरात पाऊस पडत असल्याने पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी दिसत आहे. चांगला पाऊस झाला की, या भागातील धबधबे वाहण्यास सुरू होतील. तसतशी पर्यटकांची संख्या वाढत जाईल. पावसाची आवश्यकता आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे विक्री वाढल्याने चिक्की व्यावसायिक, रिक्षावाले, हॉटेल व्यावसायिक व इतर किरकोळ व्यावसायिक समाधानी दिसत होते. (वार्ताहर)उर्से : दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत बसलेल्या शेतकरी वर्गासाठी दोन दिवसांपासून पडणारा पाऊस शेतातील पेरणीसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. सध्या भुईमूग, वाटाणा, घेवडा, वाल, मूग, चवळी पेरणीसाठी शेतकरी तयारीला लागला आहे.