शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची 'बॅण्ड पार्टी'!

By admin | Updated: July 29, 2016 19:54 IST

ज्य शासनाच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमासाठी पोषाखाचा ह्यप्रोटोकॉलह्ण आहे. भंडारा जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख जोधपुरी

प्रशांत देसाई,  भंडाराराज्य शासनाच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमासाठी पोषाखाचा ह्यप्रोटोकॉलह्ण आहे. भंडारा जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख 'जोधपुरी' हा भारतीय पोषाख परिधान करून ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे छायाचित्र भंडारा जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सुधीर वाळके यांनी २२ जुलैला फेसबुकवर अपलोड केला. या फोटोला त्यांनी उपहासात्मक 'बॅण्ड पार्टी आॅफ झेडपीबी' असे नाव लिहिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

राष्ट्रीय दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची ध्वजारोहणासाठी उपस्थिती लावावी लागते. भंडारा जिल्हा परिषद प्रांगणात ध्वजारोहणाच्या सोहळ्यासाठी येथील सर्व विभाग प्रमुख व त्यांचे अधिनस्थ कर्मचारी एकत्र आले होते. अधिकाऱ्यांच्या ह्यप्रोटोकॉलह्णनुसार सर्व विभागप्रमुख काळ्या रंगाचा ह्यजोधपुरीह्ण हा पोषाख परिधान करून एका ओळीत उभे असलेला फोटो उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून २२ जुलैला रात्री ९.४७ वाजता अपलोड केला.

या फोटोत जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके स्वत: रांगेत पहिल्यास्थानी उभे आहेत. त्यांच्यासह अन्य विभागाचे विभागप्रमुखही उभे आहेत. वाळके यांनी फेसबुकवर अपलोड करून त्या फोटोला ह्यबॅण्ड पार्टी आॅफ झेडपीबीह्ण असे नाव दिल्याचा संतापजनक प्रकार केला आहे. यावर जिल्हा परिषद सदस्य संदीप टाले यांनी, ह्यकोणाच्या लग्नात वाजवायचे आहेह्ण अशी प्रतिक्रिया दिली. या फोटोवर सहाजणांनी प्रतिक्रिया दिली असून शेवटची प्रतिक्रिया शांतिदास लुंगे (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लेंडेझरी) यांनी, व्हेरी नाइस फॉर पब्लिक वेलफेअर अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमाच्या फोटोचा दुरूपयोग करून त्यांना बॅण्ड पथकवाले संबोधल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.लग्न सोहळ्यात बॅण्ड वाजविणाऱ्या वाजंत्रिला बॅण्ड पार्टी असे संबोधतात. परंतु भंडारा जिल्हा परिषदचे अधिकारी हे सक्षम, नेतृत्व करणारे आहेत. त्यामुळे कामात पारदर्शकता ठेवून जिल्हा परिषदेला विकासाकडे नेण्यासाठी सर्वात पुढे असलेले या अर्थाने अधिकाऱ्यांच्या फोटोला बॅण्ड पार्टी असे नाव दिले. याचा कुणीही चुकीचा अर्थ लावू नये.- सुधीर वाळके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा