शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीं’च्या प्रकटदिनी भक्तिसागर उसळला

By admin | Updated: March 2, 2016 02:31 IST

संतनगरी दुमदुमली; राज्यभरातून साडेतीन लाख भक्तांची उपस्थिती.

गजानन कलोरे /शेगावटाळ-मृदंगाचा गजर आणि वारकर्‍यांच्या मुखातून निघणार्‍या गजानानाचा नामघोषाने अवघी संतनगरी मंगळवारी दुमदुमून गेली. माघ वद्य सप्तमी या तिथीनुसार १ मार्च रोजी ह्यश्रींह्णच्या प्रकटदिनाचा १३८ वा सोहळा राजवैभवी थाटात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील १ हजार ६५६ भजनी दिंड्यांसह तब्बल साडेतीन लाख भक्तांची उपस्थिती होती, हे विशेष.सकाळी १0 वाजता महारुद्र स्वाहाकार यज्ञाची पूर्णाहुती संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील व विश्‍वस्तांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी ह्यश्रींचे प्रागट्यह्णनिमित्त हभप विष्णुबुवा कव्हळेकर यांचे कीर्तन झाले. दुपारी ठीक १२ वाजता मंदिर परिसरात उपस्थित लाखो भाविकांनी मंदिराच्या दिशेने गुलाबपुष्पाची उधळण करून ह्यश्रींह्णप्रति आपली ङ्म्रद्धा अर्पण करून प्रकट क्षण भक्तिभावाने साजरा केला. दुपारी मंदिर प्रांगणातून ह्यङ्म्रींह्णच्या पालखीची रथ, मेणा व गज, अश्‍वासह नगरपरिक्रमा काढण्यात आली. श्री हरिहर शिव मंदिर, ह्यङ्म्रींह्णचे प्रकट स्थळ व श्री मारुती मंदिर या ठिकाणी विश्‍वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली. ह्यङ्म्रींह्णच्या पालखीतील वारकर्‍यांना ज्ञानेश्‍वर लिप्ते, किशोरबाबू टांक यांच्यावतीने चहा देण्यात आला. फूलवाले गोमागे यांनी ह्यङ्म्रींह्णंच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. ह्यङ्म्रींह्णची पालखी, त्या मागे ह्यङ्म्रींह्णचे तैलचित्र असलेला मेणा व सुशोभित रथ होता. त्यापाठोपाठ श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांंंची भजनी दिंडी, श्री गजानन इंग्लिश स्कूल व जवाहर नवोदय विद्यालय विद्यार्थ्यांंंची भजनी दिंडी होती. या परिक्रमेने अवघे शहर दुमदुमून गेले होते. भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवार, २ मार्चला सकाळी हभप जगन्नाथ म्हस्के यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होत आहे.