शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
5
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
6
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
7
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
9
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
11
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
12
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
13
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
14
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
15
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
16
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
17
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
18
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
19
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
20
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?

भाजपाने खंजीर खुपसला!

By admin | Updated: September 28, 2014 03:14 IST

गेली 25 वर्षे सोबत केलेल्या मित्रच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम भाजपाने केले, असा सनसनाटी आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला.

उद्धव ठाकरेंचा आरोप : लाट कशाला म्हणतात ते दाखवून देऊ
मुंबई : आपल्या हटवादीपणामुळे युती तुटली नाही. हवे तर त्याचे पुरावे देण्यास आपण तयार आहोत. भाजपाने युती तोडायचीच हे ठरवले होते. बाहेरची माणसे बरोबर घेऊन गेली 25 वर्षे सोबत केलेल्या मित्रच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम भाजपाने केले, असा सनसनाटी आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला. 
तुम्ही मांजर समजून ज्याच्या गळ्यात घंटा बांधत आहात ते मांजर नसून वाघ आहे हे विसरू नका. आमचा समुद्र आता शांत असला तरी लाट कशाला म्हणतात ते हा शिवसैनिक दाखवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ महालक्ष्मी रेसकोर्सवरील सभेत झाला. उद्धव म्हणाले की, शिवसेनेने आपल्या वाटय़ाच्या 18 जागा मित्रपक्षांना देऊ केल्या. भाजपाने मित्रपक्षांना जागा दिल्यावर त्यांच्या कमी होणा:या जागा भरून दिल्या. तरीही तीन जागांची मागणी केली गेली. त्यापैकी दोन जागा देण्याची तयारी दाखवली. मात्र शिवसेनेच्या जागा कमी करायच्या, आणि निवडणुकीपूर्वी शिवसेनेला पराभूत करायचे अशी ही रणनीती होती.  उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाकरिता युती तोडली असा आरोप ते करतात. त्यांना तसे वाटत असेल तर हो मुख्यमंत्रीपदाकरिता मी युती तोडली. परंतु तुम्हालाही मुख्यमंत्रीपदच हवे होते ना की, तुम्ही मंत्रलयात जाऊन सागरगोटे की लगोरी खेळणार होता, असा सवाल ठाकरे यांनी भाजपाला केला.
ठाकरे म्हणाले की, युती तोडण्याबाबतचा फोन एकनाथ खडसे यांनी केला. तेव्हा ते मला म्हणाले की, मांजराच्या गळ्य़ात कुणीतरी घंटा बांधली पाहिजे. तुम्ही मांजर समजून ज्याच्या गळ्य़ात घंटा बांधत आहात ते मांजर नसून वाघ आहे हे विसरू नका. आमचा समुद्र आता शांत असला तरी लाट कशाला म्हणतात ते हा शिवसैनिक दाखवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीतील मोदींची ती लाट वेगळी होती. तो इतिहास होता आता पाय जमिनीवर ठेवा, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
 
 
 
तुम्ही मांजर समजून ज्याच्या गळ्यात घंटा बांधत आहात ते मांजर नसून वाघ आहे हे विसरू नका. आमचा समुद्र आता शांत असला तरी लाट कशाला म्हणतात ते हा शिवसैनिक दाखवून देईल.
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना
 
पंकजा, प्रीतमच्या विरोधात उमेदवार नाही
प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या दोन भाजपा नेत्यांशी आपले कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे शिवसेना 288 विधानसभा मतदारसंघांपैकी पंकजा मुंडे यांना विधानसभा मतदारसंघ तर प्रीतम मुंडे लढवत असलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
 
माणिक मुंडेंनी भाजपाची उमेदवारी फेटाळली
भाजपाने जाहीर केलेल्या यादीत निवृत्त सनदी अधिकारी माणिक मुंडे यांना जिंतूरमधून उमेदवारी देऊ केली होती. मात्र मुंडे हे शिवसेनेच्या व्यासपीठावर हजर होते. भाजपाने उमेदवारी देऊनही शिवसेनेची साथ सोडणार नसल्याचा निर्णय मुंडे यांनी घेतल्याबद्दल उद्धव यांनी त्यांचे अभिनंदन केले.