शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘परे’चे तिकीट आता मोबाइलवर

By admin | Updated: July 9, 2015 03:07 IST

वेळेची बचत, तिकिटांच्या रांगेतून सुटका आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रेल्वे मंत्रालयाने पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी पेपरलेस मोबाइल तिकिटांचा (अनारक्षित) शुभारंभ केला.

मुंबई : वेळेची बचत, तिकिटांच्या रांगेतून सुटका आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रेल्वे मंत्रालयाने पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी पेपरलेस मोबाइल तिकिटांचा (अनारक्षित) शुभारंभ केला. मुंबईतील चर्चगेट येथील रेल्वेच्या मुख्यालयात या सेवेचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिल्लीतील रेल्वे भवन येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला. या सुविधेचा लाभ घेतल्यानंतर मोबाइलवर आलेले तिकीट ग्राह्य धरले जाणार आहे. तसेच येत्या दोन महिन्यांत या सुविधेद्वारे मासिक पासही दिला जाईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली. ही सुविधा केवळ सध्या पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी असणार आहे. लवकरच मध्य रेल्वेमार्गावरही ती सुरू करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत ‘यूटीएस आॅन मोबाइल’ हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले असून, गुगल प्ले स्टोअर किंवा विंडो स्टोअरमधून हे अ‍ॅप डाऊनलोड करून घेता येणार आहे. यात प्रवाशांच्या मोबाइलवर तिकिटाचा फोटो येईल आणि त्याद्वारे प्रवास करता येईल. हे अ‍ॅप यापूर्वीच तुमच्याकडे असेल तर ते अपडेट करणे गरजेचे असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. हे अ‍ॅप विकसित केलेल्या ‘क्रिस’ या रेल्वेच्या संस्थेचे मुंबईचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले, की लवकरच पेपरलेस मासिक पासही उपलब्ध करून दिला जाणार आहे. पासचे नूतनीकरणही करता येणार असल्याचे ते म्हणाले. पासची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रवाशांनी कोणती माहिती देणे गरजेचे आहे, याबाबत सध्या चाचपणी सुरू असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमास परिवहन मंत्री दिवाकर रावते, महापौर स्नेहल आंबेकर, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)