शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

‘सीमेपलीकडची स्पृश्य-अस्पृश्यता नको’

By admin | Updated: January 19, 2016 01:37 IST

सर्वच साहित्यिकांचे साहित्य अभ्यासक्रमात घेता येईल. मात्र, साहित्य हे कोणा व्यक्तीचे नसते. ते नका घेऊ, हे घ्या, अशी सीमेपलीकडची स्पृश्य-अस्पृश्यता कला,

पुणे : सर्वच साहित्यिकांचे साहित्य अभ्यासक्रमात घेता येईल. मात्र, साहित्य हे कोणा व्यक्तीचे नसते. ते नका घेऊ, हे घ्या, अशी सीमेपलीकडची स्पृश्य-अस्पृश्यता कला, संगीतात येऊ नये. किमान याच क्षेत्रातील व्यक्तींनी तरी म्हणू नये, असे मत शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. पिंपरी येथे आयोजित ८९व्या साहित्य संमेलनातील ग्रंथदालनाला तावडे यांनी भेट दिली. संमेलनात सहभागी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. शेक्सपिअर अभ्यासायला मिळतो. मात्र, कालिदास, तुकाराम, रवींद्रनाथ टागोर अभ्यासाला मिळत नाहीत, अशी खंत गुलजार यांनी साहित्य संमेलनात व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. वाचन संस्कृतीबाबत तावडे म्हणाले, ‘‘मराठी वाचकांना पुस्तके वाचायची आहेत. गेल्या काही साहित्य संमेलनातील पुस्तकांच्या विक्रीच्या आकडेवारीवरून ही गोष्ट स्प्ष्ट आहे.’’ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत विचारले असता, तावडे म्हणाले, ‘‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया राज्य शासनाने पूर्ण केल्या आहेत. आता केंद्रीय मंत्रिमंडळासमोर हा मुद्दा आला आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे यासाठी रस्त्यावर येण्याची आवश्यकता नाही.’’साहित्य संमेलनाचा निधी हा शेतकऱ्यांसाठी वळवा, अशी मागणी केली जात आहे. त्याबाबत तावडे म्हणाले, ‘‘मराठी भाषेचा, साहित्याचा हा उत्सव आहे. शासनाकडे प्राप्त झालेला निधी हा सर्वसामान्य नागरिकांच्या करातून आलेला आहे. त्यामुळे अशा संमेलनांसाठी निधी दिला पाहिजे.’’ (प्रतिनिधी)