शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

‘परे’ २२ तासांनंतर रुळावर

By admin | Updated: September 17, 2015 02:07 IST

मंगळवारी अंधेरी ते विलेपार्ले या स्थानकांदरम्यान जलद लोकलचे सात डबे रुळावरून घसरल्यामुळे विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची सेवा बुधवारीही पूर्णपणे सुरळीत झाली नव्हती.

मुंबई : मंगळवारी अंधेरी ते विलेपार्ले या स्थानकांदरम्यान जलद लोकलचे सात डबे रुळावरून घसरल्यामुळे विस्कळीत झालेली पश्चिम रेल्वेची सेवा बुधवारीही पूर्णपणे सुरळीत झाली नव्हती. ही सेवा रुळावर आणण्यासाठी २२ तास लागले आणि बुधवारी १00 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अनेक चाकरमान्यांना लेटमार्क लागला. ट्रॅकवरील डबे हटविण्याचे काम बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यासाठी सकाळचे साडेआठ वाजले आणि त्यानंतर अर्ध्या तासाने लोकल सेवा पूर्ववत झाली. लोकल सुमारे अर्धा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना स्थानकावर ताटकळत उभे राहावे लागत होते. लोकल उशिरा असल्याची माहिती सकाळपासूनच प्रसारमाध्यमांर्फत मिळाल्याने अनेकांनी खासगी वाहनांचा पर्याय अवलंबला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यांवर उतरल्याने वाहतूक कोंडीचा सामनाही मुंबईकरांना करावा लागला. मंगळवारच्या घटनेत सिग्नल यंत्रणेलाही धक्का बसल्याने जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणा प्रभावित राहिली आणि त्यामुळे रात्री उशिरापर्यंत लोकल गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्याचा फटका घरी परतणाऱ्या मुंबईकरांना बसत होता. सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने मध्य रेल्वे विस्कळीतअंबरनाथ : पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वेनंतर बुधवारी मध्य रेल्वेही अंबरनाथदरम्यान विस्कळीत झाली. दुपारी २ वाजता कर्जतकडे जाणारी लोकल बी केबिनजवळ आली असता तिच्या मोटरमनला सिग्नल न मिळाल्याने त्याने गाडी थांबवून जवळील अंबरनाथ स्थानकाला माहिती दिली. यामध्ये सिग्नलमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आले. त्यामुळे डाऊन मार्गावरची वाहतूक २५ ते ३० मिनिटे ठप्प झाली होती. हा बिघाड दुरु स्त होईपर्यंत अनेक गाड्या एकामागोमाग खोळंबल्या होत्या. यात हैदराबाद एक्स्प्रेससारख्या लांब पल्ल्याच्या गाड्याही उभ्या होत्या. अखेर, सिग्नल दुरु स्त केल्यानंतर लोकल सुरू झाल्या. या घटनेमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. परिणामी दिवसभर लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. अपघात लोकलचे चाक तुटल्याने ?हा अपघात लोकलच्या एका डब्याचे एक चाक निखळल्याने झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा डबा रेल्वे कामगार उचलत असतानाच त्याचे चाक तुटून निखळल्याचे निदर्शनास आले. याबाबत पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांनी सांगितले की, चाक निखळल्याची बाब खरी आहे. मात्र अपघाताच्या दणक्याने लोकलचे चाक निखळले की अन्य काही कारणांमुळे हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. मेल-एक्सप्रेस रेल्वेवर परिणाम मुंबईत येणाऱ्या व मुंबईतून सुटणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्यांवरही परिणाम झाला. ट्रेन नंबर १२९३२ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल डबल डेकर ट्रेनचा बोरीवली स्थानकात शेवट करण्यात आला. ट्रेन नंबर १२९३१ मुंबई सेन्ट्रल-अहमदाबाद डबल डेकर दुपारी तीन वाजता बोरीवली स्थानकातून सोडण्यात आली. तर कर्णावती एक्सप्रेसह अन्य काही एक्सप्रेसचा बोरिवलीत शेवट करण्यात आला. बोरीवलीहून लोकल रिटर्न। सकाळी ६ वाजता पूर्ण होणारे काम हे साडे आठ वाजता पूर्ण झाले. हे काम पूर्ण होण्यापूर्वी धीम्या लोकल गाड्या खूपच उशिराने धावत होत्या. तर काही गाड्यांना अंधेरी तसेच बोरीवली स्थानकातून पुन्हा विरारकडे पाठवण्यात येत होते. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. १८ व २१ सप्टेंबर रोजी चौकशीला सुरुवात । योची रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत चौकशी केली जाणार आहे. १८ व २१ सप्टेंबर रोजी चौकशीला सुरुवात होईल, अशी माहिती परेने दिली. घटनेबाबत काही माहिती असल्यास प्रवासी किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांनी चर्चगेट येथील रेल्वेच्या मुख्यालयातील सुरक्षा आयुक्तालयात संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.