शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

खबरदार.. जन्मदात्यांना वार्‍यावर सोडाल तर !

By admin | Updated: August 21, 2014 00:27 IST

ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायधिकरणचे आदेश : दरमहा निर्वाह भत्ता देण्याचे निर्देश

वाशिम : वृद्धापकाळात जन्मदात्याचा आधारवड बनण्याऐवजी त्यांना वार्‍यावर सोडणार्‍या अपत्यांना उपदेशाचे डोज पाजण्याबरोबरच, उपविभागीय अधिकारी तथा ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायधिकरण वाशिमच्या न्यायालयाने आई-वडलांना दरमहा निर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत. जामखेड व रिसोड येथील जन्मदात्याने मुलांविरूद्ध दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात न्यायाधीश अशोक अमानकर यांनी उपरोक्त आदेश दिले आहेत. मालेगाव तालुक्यातील जामखेड व रिसोड येथील जन्मदात्याने ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण वाशिमच्या न्यायालयात अपत्यांविरूद्ध प्रकरण दाखल केले होते. जामखेड येथील देवराव कोंडजी पोफळे यांनी वृद्धापकाळात मुलभूत गरजा भागविण्यासाठी अपत्यांकडून निर्वाह भत्ता मिळण्याची मागणी केली होती. दुसर्‍या प्रकरणात रिसोड येथील पद्मावती गिरीषचंद्र पंचवाटकर यांनीदेखील वृद्धापकाळात मुलभूत व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अपत्यांकडून निर्वाह भत्ता मिळण्याबाबत प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. उपरोक्त दोन्ही प्रकरणात अपत्यांनी सांभाळ करण्याबरोबरच निर्वाह भत्ता देण्यास नकार दिल्याच्या व्यथा जन्मदात्यांनी न्यायाधीश अशोक अमानकर यांच्याकडे मांडल्या होत्या. विद्यमान न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून, जन्मदात्यास वृद्धापकाळात आर्थिक मदतीची गरज असल्याने अपत्यांनी निर्वाह भत्ता द्यावा, असे आदेश बजावले. देवराव पोफळे यांना सर्व अपत्यांनी प्रत्येकी ५00 रुपये याप्रमाणे दरमहा तीन हजार रुपये तर दुसर्‍या प्रकरणात पद्मावती पंचवाटकर यांना सर्व अपत्य मिळून दरमहा सहा हजार रुपये देण्याचे आदेश न्यायाधीश अमानकर यांनी दिले.

** असे होत्या रिसोड येथील वयोवृद्ध आईच्या व्यथा..

रिसोड येथील सराफा लाईनमधील रहिवासी पद्मावती गिरीषचंद्र पंचवाटकर यांनी दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अपत्यांकडून निर्वाह भत्ता मिळण्याबाबत विद्यमान न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. ७८ वर्षीय पद्मावती पंचवाटकर यांना देवेंद्र, चंद्रकांत, सुर्यकांत, प्रकाश व आदेश अशी पाच मुले आहेत. त्या सध्यस्थितीत प्रकाश नामक मुलाकडे राहतात. पती गिरीशचंद्र पॅरालिसीस या आजाराने ग्रस्त आहेत. मोठा मुलगा नोकरीवर असून उर्वरीत मुले खासगी कामधंदा करतात. प्रकाश नामक मुलाकडे राहत असताना ८ जानेवारी २0१४ रोजी त्यालाही (प्रकाश) पॅरालिसीसचा झटका आल्याचे पद्मावती पंचवाटकर यांनी विद्यमान न्यायालयात स्पष्ट केले. प्रकाशही आजाराने ग्रस्त असल्याने घरात आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर मोठय़ा मुलाने उदरनिर्वाहाचा खर्च भागवावा, अशी विनवणी आईने न्यायालयाकडे केली होती. यावर विद्यमान न्यायालयाने सर्व अपत्यांना नोटीस बजावून सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मोठा मुलगा देवेंद्र यांनी त्यांच्या हिश्श्यावर येणारी रक्कम देण्याची तयारी दर्शविली. चंद्रकांत यांनी आई-वडिल राहत्या घरात राहु देत असतील तर निर्वाह खर्च देण्याची अन्यथा खर्च देण्यास नकार दिला. प्रकाश यांनी राहते घर परत करण्याची तयारी दर्शवून आई-वडीलाचा सांभाळ करण्यास नकार दिला. लहान मुलगा आदेश यांनी स्वत: मजूरी करीत असल्याने निर्वाह खर्च देऊ शकत नसल्याचे म्हटले होते. या पृष्ठभूमीवर न्यायाधीश अशोक अमानकर यांनी सर्व अपत्यांना निर्वाह खर्च देण्याची ह्यक्षमताह्ण विचारली असता, सर्वांनी आपापल्या परीने उत्तर दिले. वृद्धापकाळात आई-वडिलांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे विद्यमान न्यायालयाने पटवून दिले. पाच मुले मिळून आई-वडिलांना दरमहा सात तारखेच्या आत सहा हजार रुपये देण्याचे आदेश न्यायाधीश अमानकर यांनी दिले. या आदेशाचे उल्लंघन केल्यास अपत्यांविरूद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याचे विद्यमान न्यायालयाने स्पष्ट बजावले.