शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल सामन्यावेळी सोलापूरात सट्टेबाजी

By admin | Updated: April 28, 2016 20:11 IST

बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास दिल्ली डेअरडेविल्स व गुजरात लॉयन्स या सामन्यावेळी सट्टा खेळत लोकांकडून पैज लावत असताना सोलापूरातील पाच जणांना विजापूर नाका

- आप्पासाहेब पाटील, 
 
सोलापूर, दि. २८ - बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास दिल्ली डेअरडेविल्स व गुजरात लॉयन्स या सामन्यावेळी सट्टा खेळत लोकांकडून पैज लावत असताना सोलापूरातील पाच जणांना विजापूर नाका पोलीसांनी रंगेहाथ पकडले़ यावेळी त्यांच्याकडे असलेले १२ लाख १७ हजार १०० रूपये रोख रकमेसह लॅपटॉप, मोबाईल जप्त आदी साहित्य जप्त करण्यात शहर पोलीसांना यश आले आहे़
अनिल सिद्राम व्हनमाने (वय ४०, रा़ घर नंबर ५, दाजी पेठ, सोलापूर), देवानंद विश्वनाथ आडम (वय ३८ रा़ १५५/३ गांधी नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर), संजय सिद्राम व्हनमाने (वय ४२, रा़ घर नं ५, दाजी पेठ, सोलापूर), राजू चंद्रकांत मंगलारम (वय ४२, रा़ १३८७ दाजी पेठ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या सट्टेबाजांचे नाव आहे़
या घटनेची पोलीसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, विजापूर महामार्गावर असलेल्या सोरेगावात येथे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणुक सुरू होती़ या मिरवणुकीच्या बंदोबस्ताकरिता विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एऩजी़अंकुशकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई लिगाडे, वाल्मिकी, पोना राठोड, चव्हाण,गेजगे, माळी, जाधव, लोहार, वाडेकर हे होते़ मिरवणुक बंदोबस्त संपल्यानंतर या भागात पेट्रोलिंग करीत असताना खबºयामार्फत विजापूर महामार्गावर इनोव्हा (एमएच ०६ एएस ३७२९) या कारमध्ये आयपीएल सामन्यावर सट्टा चालत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली़ या माहितीवरून विजापूर नाका पोलीसांनी संबंधित ठिकाणी भेट दिली़ यावेळी दिल्ली डेअरडेविल्स व गुजरात लॉयन्स या दोन संघात सुरू असलेला सामना थेट प्रक्षेपणाव्दारे चालू असल्याचे दिसून आले़ याठिकाणी पैसे घेऊन सामन्यावर सट्टा लावीत असल्याचे पोलीसांना आढळून आले़  यावेळी त्यांच्या हातात असलेले १२ लाख १७ हजार १०० रूपयासह मोबाईल, लॅपटॉप विजापूर नाका पोलीसांनी जप्त केले आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लिगाडे हे करीत आहेत़
 
उद्या न्यायालयात हजर करणार
दिल्ली डेअरडेविल्स व गुजरात लॉयन्स या आयपीएल सामन्या दरम्यान सट्टे खेळत असताना पाच जणांना अटक केली आहे़ या पाच आरोपींकडून मुद्देमालासह साहित्य जप्त केले आहे़ याप्रकरणात अटकेत असलेल्या पाच जणांना शुक्रवार २९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़ या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता शहर पोलीसांनी व्यक्त केली आहे़
 
ग्रामीण भागातही सट्टेबाजार सुरू
शहरात आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाºयांना अटक केल्याची घटना घडली़ या प्रकरणाचा संपूर्ण तपास करीत असताना ग्रामीण भागातही हा सट्टा खेळला जात असल्याची माहिती समोर आली आहे़ याबाबत ग्रामीण पोलीसांशी चर्चा झाली आहे़ या कारवाईनंतर ग्रामीण पोलीसही अलर्ट झाले आहे़
 
विजापूर महामार्गावर आयपीएल सामन्यावर सट्टा असल्याची माहिती मिळाली़ या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी धाड टाकून पाच जणांना अटक केली आहे़ कायदेशीर फिर्याद विष्णु जाधव यांनी दिली आहे़ पोलीस आयुक्त रविंद्र सेनगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे़
- एऩ.जी़.अंकुशकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
विजापूर नाका पोलीस, सोलापूऱ