शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

संगणकापेक्षा मेंदूच जलद

By admin | Updated: June 28, 2016 02:06 IST

६ ते १३ वयोगटातील मुलांनी ‘अ‍ॅबेकस’चा वापर करून कठीण गणिते सोडवून दाखविली.

मुंबई : ६ ते १३ वयोगटातील मुलांनी ‘अ‍ॅबेकस’चा वापर करून कठीण गणिते सोडवून दाखविली. मेंदू विरुद्ध संगणक - कॅल्क्युलेटर अशा थेट झालेल्या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून, लहान वयात अ‍ॅबेकस शिकण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.शनिवारी सीबीएस एज्युकेशन या संस्थेने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यादरम्यान हा उपक्रम पार पडला. या वेळी संस्थेचे सी.डी. मिश्रा, भानू राजपूत आणि संजय भोईर या संचालकांसह अ‍ॅबेकस पद्धतीत यश मिळविलेले विद्यार्थीही उपस्थित होते. याप्रसंगी, १८ वर्षीय साहिल शहा म्हणाला की, अ‍ॅबेकसच्या भक्कम शिकवणीमुळे आयसीएसईच्या परीक्षेत संपूर्ण देशात तिसरे स्थान मिळविता आले. राहुल जैन हा आयआयटी रुकरीचा विद्यार्थी असून, त्याने अल्पवयीन डीग्री करून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक आणि फिजिक्समध्ये बी.टेक केले आहे. त्यानेही अ‍ॅबेकसच्या प्रशिक्षणाचे योगदान आपल्या मनोगतातून अधोरेखित केले. यानंतर, अवघ्या ६ वर्षांच्या मुस्कान तेकचंदानी हिने कठीण असलेली गणिते काही सेकंदांत सोडवून दाखविली.या उपक्रमाविषयी सी.डी. मिश्रा म्हणाले की, बौद्धिक, गणनपद्धती जलद आणि अचूकपणे करण्यास शिकल्यामुळे मल्टीटास्किंग, वेळेचे व्यवस्थापन, स्मृती, एकाग्रता आणि मानसिक क्षमता विकसित झाली आहे. अ‍ॅबेकसचे प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये हे कौशल्य दिसून येते. अ‍ॅबेकसचे प्रशिक्षण म्हणजे केवळ गणित सोडविणे नसून एखाद्या घटनेकडे वस्तुनिष्ठपणे पाहता येते. (प्रतिनिधी)