ठाणो : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी ढोकाळी येथील हायलॅण्ड मैदानात जाहीर सभा होणार आहे. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी रेमण्ड कंपनी येथे हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणच्या सुरक्षिततेची जबाबदारी शहर पोलिसांकडे असल्याने त्यांच्याकडूनही चोख बंदोबस्त लावण्यात आला
आहे.
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच ठाण्याच्या दौ:यावर येत आहेत. त्यांची जाहीर सभा सेंट्रल मैदानात घेण्याचे प्रयत्न भाजपाकडून केले जात होते. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव नवी मुंबईतील पटनी मैदानात सभा घेण्याची सूचना आयोजकांना केली होती.
भाजपा कार्यकर्ते ठाणो शहरात सभा घेण्यावर ठाम राहिल्याने ती ढोकाळी येथील हायलॅण्ड मैदानावर घेण्याचा पर्याय पोलिसांनी सुचवला. मात्र, हे मैदान रविवारी राष्ट्रवादीने आरक्षित केल्याने मोदींच्या सभेबाबत अनिश्चितता होती. अखेर, राष्ट्रवादीने हे मैदान मोदींच्या सभेसाठी दिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. (प्रतिनिधी)
पोलीस तैनात
यामध्ये 6 पोलीस उपायुक्त, 12 सहायक पोलीस आयुक्त, 1 हजार अधिकारी-कर्मचा:यांबरोबरच स्थानिक पोलिसांचा समावेश आहे.