शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

युतीच्या सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देणाऱ्या युती सरकारने सत्तेत आल्यानंतर जनविरोधी धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना

काँग्रेस उतरली रस्त्यावर : धोरणांविरोधात घोषणाबाजीनागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देणाऱ्या युती सरकारने सत्तेत आल्यानंतर जनविरोधी धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी आश्वासनांवर झुलवत ठेवले आहे, असा आरोप करीत काँग्रेस कमिटीने व्हेरायटी चौकात रास्तारोको केला. माजी मंत्री नितीन राऊ त, शहर काँगे्रसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.सरकार विरोधात घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होते. काही वेळ चौकातील वाहतूक रोखल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. आंदोलनात यात अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, प्रफुल्ल गुडधे, उमाकांत अग्निहोत्री, दीपक कापसे, प्रशांत धवड, डॉ. गजराज हटवार, राजू व्यास, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके, जयंत लुटे, तानाजी वनवे, संजय दुधे, संजय दुबे, नगरसेविका निमिषा शिर्के, मालूताई वनवे, प्रेरणा कापसे, शीला मोहड, सिंधू उईके, पुष्पा निमजे, रेखा बाराहाते, सुरेश पिल्लेवार यांच्यासह शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. केंद्र व राज्य सरकारने त्यांना अद्याप आर्थिक मदत दिलेली नाही. शेतकरी पॅकेजच्या नावाखाली तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. तसेच दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आले. निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळण्यास युती सरकारने नकार देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचे विकास ठाकरे म्हणाले. भूमी अधिग्रहण कायद्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. उद्योगपती व बिल्डर यांनाच या धोरणाचा लाभ होणार आहे. दुसरीकडे उद्योगपतींच्या भल्यासाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना माफक दरात होणारा धान्यपुरवठा बंद केला आहे. सवलतीत कपात करण्यात आल्याने सात हजार लघु उद्योजकांपुढे गंभीर संकट उभे ठाकल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. (प्रतिनिधी)अटक व सुटकाशेकडो आंदोलकांनी स्वत:ला अटक करून घेतली. सर्वांना पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.