शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

आर्थिक संकटातून निघणार ‘बेस्ट’ मार्ग

By admin | Updated: March 28, 2017 03:43 IST

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट या सार्वजनिक उपक्रमाला मदतीचा हात देण्यासाठी महापालिकेने अखेर पावले

मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट या सार्वजनिक उपक्रमाला मदतीचा हात देण्यासाठी महापालिकेने अखेर पावले उचलली आहेत़ त्यानुसार महापालिका आणि बेस्टचा अर्थसंकल्प एकत्रित करण्याबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत सोमवारी चर्चा करण्यात आली़ बेस्ट प्रशासनाने याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर केल्यानंतर यावर निर्णय होणार आहे़गेली अनेक वर्षे बेस्ट उपक्रम तोट्यात आहे़ उत्पन्नाहून खर्चच अधिक असल्याने बेस्टचे वाहतूक विभाग तुटीत आहे़ हे कर्जाचे डोंगर वर्षागणिक वाढत असल्याने बेस्ट उपक्रमाला टाळे लागण्याची वेळ आली आहे़ कामगारांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन देण्यासाठी बेस्टकडे पैसे नव्हते़ त्यामुळे पालक संस्था म्हणून महापालिकेने बेस्ट उपक्रमाला सावरावे, अशी मागणी जोर धरत आहे़ या संकटातून बेस्टला कसे बाहेर काढता येईल? याबाबतचा कृती आराखडाच तयार केला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली़ बेस्ट आणि पालिकेचा अर्थसंकल्प एकत्र करुन मांडल्यास बेस्टला पालिकेतून आर्थिक मदत करणे शक्य होईल, असे गटनेत्यांचे मत या बैठकीत तयार झाले़ याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर करुन आपली मागणी ठेवण्याची सुचना बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांना महापौरांनी केली आहे़ (प्रतिनिधी)वचननाम्यामुळे शिवसेना बांधीलशिवसेनेने महापालिकेच्या निवडणुकीवेळी बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढून मुंबईकरांचा प्रवास जलद व सुखकर करण्याची हमी दिली होती़ मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता आल्यामुळे आपले वचन पाळण्यास शिवसेना बांधिल आहे़ त्यामुळे बेस्ट व महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्रित करण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरु आहे़कायद्याची अडचणबेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्रित केल्यास तुटीतून बाहेर पडण्याचा मार्ग बेस्टला सापडणार आहे़ मात्र यासाठी बेस्ट आणि पालिकेच्या कायद्यात तरतूद करावी लागणार आहे. याबाबत बुधवारी पुन्हा महापौरांच्या दालनात बैठक होणार आहे. आराखडा द्यावा लागणार महापालिकेकडून बेस्टला कोणत्या स्वरुपात मदत करता येईल, याबाबत सविस्तर अहवाल दोन दिवसात सादर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाने पालिकेकडे एक हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. तर २०१३ मध्ये बेस्टला १६०० कोटी रुपयांचे कर्ज दहा टक्के व्याजाने महापालिकेने दिले होते. त्यातील ९०० कोटी रुपयांची बेस्टने परतफेड केली आहे. त्यामुळे आणखी निधी दिल्यास आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट कोणती पावले उचलणार, यावर सविस्तर आराखडा बेस्टला द्यावा लागणार आहे़शिवसेनेची भाजपाला गुगलीराज्य व केंद्र सरकारला मुंबईतून कर जातो़ हा कर कोट्यवधी रुपयांचा असल्याने येथील सार्वजनिक उपक्रम वाचविण्यासाठी त्यांचे योगदानही अपेक्षित आहे, अशी गुगली महापौरांनी भाजपा सरकारपुढे टाकली आहे़