शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बस सेवांमुळे बेस्टचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: August 27, 2016 02:00 IST

रिक्षा, टॅक्सी, मोनो, मेट्रो अशा स्पर्धेनंतर आता खासगी बसगाड्यांचे आव्हान बेस्टपुढे उभे राहिले आहे़

मुंबई : रिक्षा, टॅक्सी, मोनो, मेट्रो अशा स्पर्धेनंतर आता खासगी बसगाड्यांचे आव्हान बेस्टपुढे उभे राहिले आहे़ मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या सभेमध्ये मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील खासगी कंत्राटी परवाना व खासगी सेवा वाहन परवाना असणाऱ्या बसगाड्यांना मुक्त संचारास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ त्यामुळे बेस्टचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याने हा निर्णय मागे घेण्याची मागणी बेस्ट समिती सदस्यांनी शुक्रवारी केली़ याविरोधात सोमवारी टॅक्सी संपामध्ये बेस्ट कर्मचारीही उतरतील, असा इशारा देण्यात आला.बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग तोट्यात आहे़ शेअर रिक्षा-टॅक्सी, मोनो, मेट्रो व खासगी वाहतुकीच्या स्पर्धेत बेस्टच्या प्रवाशांची संख्या ४२ लाखांवरून ३६ लाखांवर आली आहे़ त्यात आता खासगी बसगाड्यांनाही मुंबईत सेवा पुरविण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे़ याचे तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत शुक्रवारी उमटले़ प्रचंड वाहतूककोंडीत दररोज बेस्टच्या बसगाड्या ७ लाख किलोमीटर अंतर कापत असतात़ आपत्ती काळातही बेस्ट मदतीसाठी पुढाकार घेत असते़ तरीही बेस्ट सेवा ही प्रवाशांची सेवा करण्यास सक्षम नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला, अशी खंत शिवसेनेचे सुनील गणाचार्य यांनी व्यक्त केली़ बेस्टची ताकद कमी करून खासगीकरणाची वाट मोकळी करून देण्याचा हा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला़ गावखेड्यात ४५ हजार बसगाड्यांची आवश्यकता असताना राज्य परिवहनच्या गाड्या मुंबईत चालविण्याचे प्रयोजन काय, असा सवाल शिवसेनेचे सुहास सामंत यांनी केला़ अखेर या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्याची विनंती करणार असल्याचे आश्वासन बेस्ट समितीचे अध्यक्ष मोहन मीठबावकर यांनी दिले़ (प्रतिनिधी)>टॅक्सीच्या संपात बेस्टटॅक्सी संघटनांनी सोमवारी संपाचा इशारा दिला आहे़ या संपात बेस्ट कर्मचारीही उतरतील, असा इशारा बेस्ट कामगार सेनेचे पदाधिकारी व बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत यांनी दिला आहे़बेस्टच्या ताफ्यात गेल्या वर्षीपर्यंत ४ हजार ७०० बस होत्या. त्या आता ३ हजार ८०० वर आल्या आहेत;तर प्रवासीसंख्या ४२ लाखांवरून ३६ लाखांवर घसरली आहे़