शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

आर्थिक संकटातून निघणार बेस्ट मार्ग

By admin | Updated: March 27, 2017 20:11 IST

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट या सार्वजनिक उपक्रमाला मदतीचा हात देण्यासाठी महापालिकेने अखेर पावलं उचलली आहेत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 27 - आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट या सार्वजनिक उपक्रमाला मदतीचा हात देण्यासाठी महापालिकेने अखेर पावलं उचलली आहेत. त्यानुसार महापालिका आणि बेस्टचा अर्थसंकल्प एकत्रित करण्याबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत आज चर्चा करण्यात आली. बेस्ट प्रशासनाने याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर केल्यानंतर यावर निर्णय होणार आहे.गेली अनेक वर्षे बेस्ट उपक्रम तोट्यात आहे. उत्पन्नाहून खर्चच अधिक असल्याने बेस्टचे वाहतूक विभाग तुटीत आहे, हे कर्जाचे डोंगर वर्षागणिक वाढत असल्याने बेस्ट उपक्रमाला टाळे लागण्याची वेळ आली आहे. कामगारांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन देण्यासाठी बेस्टकडे पैसे नव्हते. त्यामुळे पालक संस्था म्हणून महापालिकेने बेस्ट उपक्रमाला सावरावे, अशी मागणी जोर धरत आहे. या संकटातून बेस्टला कसे बाहेर काढता येईल? याबाबतचा कृती आराखडाच तयार करण्यात आला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात आज झालेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. बेस्ट आणि पालिकेचा अर्थसंकल्प एकत्र करून मांडल्यास बेस्टला पालिकेतून आर्थिक मदत करणे शक्य होईल, असे गटनेत्यांचे मत या बैठकीत तयार झाले. याबाबत दोन दिवसांत अहवाल सादर करून आपली मागणी ठेवण्याची सूचना बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांना महापौरांनी केली आहे.वचननाम्यामुळे शिवसेना बांधीलशिवसेनेने महापालिकेच्या निवडणुकीवेळी बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढून मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुखकर करण्याची हमी दिली होती. मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता आल्यामुळे आपले वचन पाळण्यास शिवसेना बांधील आहे. त्यामुळे बेस्ट व महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्रित करण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरू आहे.कायद्याची अडचणबेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्रित केल्यास तुटीतून बाहेर पडण्याचा मार्ग बेस्टला सापडणार आहे. मात्र यासाठी बेस्ट आणि पालिकेच्या कायद्यात तरतूद करावी लागणार आहे. याबाबत बुधवारी पुन्हा महापौरांच्या दालनात बैठक होणार आहे. यावर असेल अहवालमहापालिकेकडून बेस्टला कोणत्या स्वरुपात मदत करता येईल, याबाबत सविस्तर अहवाल दोन दिवसांत सादर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाने पालिकेकडे एक हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. तर २०१३ मध्ये बेस्टला १६०० कोटी रुपयांचे कर्ज दहा टक्के व्याजाने महापालिकेने दिले होते. त्यातील ९०० कोटी रुपयांची बेस्टने परतफेड केली आहे. त्यामुळे आणखी निधी दिल्यास आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट कोणती पावलं उचलणार, यावर सविस्तर आराखडा बेस्टला द्यावा लागणार आहे.शिवसेनेची भाजपाला गुगलीराज्य व केंद्र सरकारला मुंबईतून कर जातो़ हा कर कोट्यवधी रुपयांचा असल्याने येथील सार्वजनिक उपक्रम वाचविण्यासाठी त्यांचे योगदानही अपेक्षित आहे, अशी गुगली महापौरांनी भाजपा सरकारपुढे टाकली आहे.