शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

साध्या व वातानुकूलित बसपासमध्ये बेस्ट कपात

By admin | Updated: May 4, 2016 19:45 IST

बस भाड्यात कपात करणार, ही भाजपाची घोषणाबाजी अखेर धूळफेकच ठरली़ बस मार्गांमध्ये नवे टप्प्यांचा समावेश करुन भाडे कमी केल्याचे बेस्ट उपक्रमाने भासविले आहे़

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ४ : बस भाड्यात कपात करणार, ही भाजपाची घोषणाबाजी अखेर धूळफेकच ठरली़ बस मार्गांमध्ये नवे टप्प्यांचा समावेश करुन भाडे कमी केल्याचे बेस्ट उपक्रमाने भासविले आहे़. मात्र मासिक व त्रैमासिक बस पास आणि वातानुकूलित बस भाड्यात कपात करुन प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे़ या प्रस्ताव बेस्ट समितीने आज मंजुरी दिली़बेस्ट समितीचे अध्यक्षपद येताच भाजपाने वीज आणि भाडे कपात करीत असल्याचे घोषणा केली़ त्यानुसार फिडर मार्ग म्हणजेच कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यात येईल, असे सांगण्यात येत होते़ प्रत्यक्षात बसमार्गांमध्ये नवीन टप्याचा समावेश करुन भाडे कमी केल्याचे दाखविण्यात आले आहे़

मात्र बेस्टने बसच्या मासिक व त्रैमासिक पासाच्या रक्कमेत खऱ्या अर्थाने कपात केली आहे़ त्यामुळे प्रवाशांचे ३० ते १०० रुपये वाचणार आहेत़ प्रवाशीवर्ग वाढविण्यासाठी वातानुकूलित बसचा दैनंदिन पास दोनशे रुपयांवरुन दीडशे रुपये तर मासिक बसपास दीड हजार रुपयांनी कमी करण्यात आला आहे़बस भाडेकपातीची धूळफेकफिडर मार्ग म्हणजेच घरापासून रेल्वे स्थानकांपर्यंत यावर सर्वाधिक प्रवाशी असतात़ या बसमार्गांवरील भाड्यात कपात करण्यात येणार असल्याची घोषणाबाजी भाजपाने केली़ मात्र प्रत्यक्षात प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावात बस प्रवासाचे नवीन टप्पे टाकून भाडेकपात केल्याचे भासविण्यात येत आहे़ यामुळे मुंबईकरांना कोणताच फायदा नसून बेस्टचे नुकसान मात्र होणार आहे़अशी आहे भाडेकपातकि़मी़            विद्यमान बसभाडे            नवीन भाडे   २                      ८                                   ८   ४                     १०                                  १०   ६                     १४                                  १४   १०                    १८                                  १८

यामध्ये नवीन १२ टप्पा टाकून त्याचे भाडे २० रुपये करण्यात आले आहे़    १४                     २२                                    २२१७ टप्पा टाकून त्याचे भाडे २४ रुपये करण्यात आले आहे़     २०                    २६                                     २६२५ हा नवीन टप्पा त्याचे भाडे २८ रुपये      ३०                     ३०                                   ३०३५ टप्पा टाकून त्याचे भाडे ३६ रुपये        ४०                    ४२                                   ४२४५ टप्पा टाकून त्याचे भाडे ४६ रुपये      ५०                      ५०                                  ५०भाडेकपातीमध्ये उत्पन्नात घटबसभाड्यांमध्ये कपात केल्यानंतर दररोज बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्नात चार लाख ६१ हजार रुपयांची घट होणार आहे़ त्यामुळे या बसगाड्यांचे दररोज २२ हजार ३३५ प्रवासी वाढविणे आवश्यक आहे़  बस पासमध्ये ३० दिवसांऐवजी २२ दिवसांचे पैसे प्रवाशांकडून घेण्यात येणार आहेत़ तर त्रैमासिक पास ९० ऐवजी ६६ दिवसांचा असणार आहे़ मासिक व त्रैमासिक बसगाड्यांच्या भाड्यात कपात केल्यामुळे दररोज चार लाख ८१ हजार रुपयांचे उत्पन्न घटणार आहे़ त्यामुळे या मार्गावर दररोज ५५५ जादा प्रवाशी मिळण्याची गरज आहे़  

वातानुकूलित बसगाड्यांचा दैनंदिन पास दोनशे रुपयांऐवजी दीडशे रुपये, मासिक बसपास ४८०० वरुन ३३०० रुपये तर त्रैमासिक पास ९९०० रुपयांचा असणार आहे़ या भाडेकपातीमुळे एक लाख ६० हजार रुपये उत्पन्न घटणार आहे़ त्यामुळे वातानुकूलित बसगाड्यांचे आणखी २४०० प्रवाशी वाढविण्याची गरज आहे़