शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

...अखेर बेस्ट संप १६ तासांनी मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 05:10 IST

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप अखेर १६ तासांनी मागे घेण्यात आला. दर महिन्याचा पगार १० तारखेपर्यंत देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप अखेर १६ तासांनी मागे घेण्यात आला. दर महिन्याचा पगार १० तारखेपर्यंत देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली आहे. तरीही लेखी आश्वासनासाठी अडून बसलेले कामगार नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोंडी आश्वासनानंतर नरमले. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात बेस्ट सेवा बंद असल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी गेले काही महिने महापालिका आणि बेस्ट प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती. मात्र, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात सहा वेळा झालेल्या बैठका निष्फळ ठरल्याने, कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले. या आंदोलनाची दखल कोणी घेत नसल्याचे पाहून कामगारांनी संपाचा इशारा दिला. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत बेस्ट कर्मचाºयांचा पगार १० तारखेपर्यंत देण्याचे आयुक्त अजय मेहता यांनी मान्य केले, परंतु असे लेखी आश्वासन देण्यास ते तयार नसल्याने, कामगार संघटनांनी रविवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला. या संपात ३६ हजार कामगार-कर्मचारी सहभागी झाल्यामुळे बससेवा ठप्प झाली.बेस्ट उपक्रम म्हणजे, मुंबईची दुसरी लाइफ लाइन असल्याने, मुंबईकरांचे सोमवारी दिवसभर प्रचंड हाल झाले. ज्याचा पुरेपूर फायदा उठवित, रिक्षा, टॅक्सी व खासगी बस वाहतुकीने प्रवाशांकडून दामदुप्पट पैसे उकळत आपले खिसे भरले.उद्धव ठाकरेंची दिलगिरीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी मातोश्रीवर कामगार नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी बेस्टची जबाबदारी घेण्याची तयारी दाखविली. बेस्टचे पगार वेळेत होतील, याची शाश्वती त्यांनी कामगार नेत्यांना दिली.मात्र, हे आश्वासनही तोंडीच असताना, बेस्ट कामगार कृती समितीने संप मागे घेतल्याचे जाहीर केले. कामगार नेत्यांनी संपाचे हत्यार म्यान केल्याने, कामगार सायंकाळी कामावर रूजू झाले. त्यानंतर, बेस्ट बस गाड्या पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.रक्षाबंधनानिमित्त सकाळी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे बेस्ट संपामुळे हाल झाले, याबद्दल उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर मुंबईकरांची माफी मागितली. या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. याबाबत आपण दिलगीर आहोत, असे त्यांनी सांगितले.